
जिल्हा शल्य चिकित्सकांनी दुसरा रिपोर्ट दिला आहे. हा धक्कादायक प्रमाणपत्र असून बदलीसाठी देण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी श्रीमती सावकारे यांनी सीईओ यांच्याकडे केली आहे.
जळगाव : किन्ही (ता. भुसावळ) येथील ग्रामसेविकेने बदली रद्द करण्यासाठी हृदयासंबंधीचे आणि पक्षाघाताचा त्रास असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. प्रमाणपत्रानुसार बदली थांबविण्यात आली. मात्र ग्रामसेविकेने सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघड झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त अहवालावरून हा प्रकार उघडकीस आलपा आहे.
किन्ही येथील ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी करत त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, संबंधित ग्रामसेविकेला आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचा अर्थात रिपोर्ट नील असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दुसरा रिपोर्ट दिला आहे. हा धक्कादायक प्रमाणपत्र असून बदलीसाठी देण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी श्रीमती सावकारे यांनी सीईओ यांच्याकडे केली आहे.
बोगस प्रमाणपत्र देणारे रॅकेट?
बदली झाल्यानंतर किंवा सुटी हवी असल्यास अनेकजण बोगस प्रमाणपत्राचा आधार घेत असतात. अनेक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषयक समस्या असल्याचे प्रमाणपत्र देऊन बदली प्रक्रिया थांबविली आहे. काहींनी सोयीची बदली करून घेतली आहे. किन्ही येथील एक प्रकार समोर आला आहे. किन्ही येथील ग्रामसेविकेच्या प्रकरणावरून जिल्ह्यात बदलीसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विभागीय आयुक्तांकडे जाणार प्रस्ताव
सदर प्रकरणी विभागीय आयुक्तांकडे कारवाईबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल. विभाग स्तरावरून याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.