गुलाबरावांनी केली फडणवीसांसाठी प्रार्थना...काय आहे कारण वाचा

devendra fadnavis gulabrao patil
devendra fadnavis gulabrao patil

जळगाव : कोरोना झाल्यानंतर सरकारी हॉस्पीटलमध्ये उपचार करण्याबाबत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्‍यांना कोरोना झाल्‍यानंतर ते खासगी रूग्णालयात जावो किंवा सरकारी रूग्णालयात, शासनाची धावपळ होणारच हे त्यांना माहिती आहे. पण, परमेश्‍वर करो त्या ‘कोरोना’ होवू नये ही प्रार्थना करत असल्‍याचे पाणी पुरवठा व केंद्रीय गृहमंत्री तथा जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे म्‍हटले. 
राज्‍याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्‍या आठवड्यात जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले होते. या दरम्‍यान त्‍यांनी मला कोरोना झाल्‍यास सरकारी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्याबाबत गिरीश महाजन यांना म्‍हणाले होते. यावर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फडणवीस यांना उपचारासाठी कुठेही दाखल केले; तरी शासनाची धावपळ उडणार आहे. पण त्‍यांना कोरोनाची लागण ना होवो हीच परमेश्‍वराकडे प्रार्थना असल्‍याचे पाटील म्‍हणाले. 

सत्‍ता बदल नाहीच
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांची भेट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्ताबदलाचे संकेत आहेत काय? या प्रश्‍नावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, कि भाजपने मध्यप्रदेशात सत्ता बदल केली; हा विषय जुना झाला आहे. मात्र त्यांनी राजस्थानमध्ये हा प्रयत्न करून पाहिला त्या ठिकाणी भाजपला पटकी खावी लागली. यामुळे त्‍यांनी महाराष्ट्रात सत्ताबदलच्यादृष्टीने पाहूच नये. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे तब्बल १७० आमदार आहेत. बहुमतापेक्षा अधिक आमदार आहेत. तब्बल ५० आमदार फोडायचे म्हणजे काय बाजारात जावून बैलजोडी खरेदी करण्याइतके ते सोपे नाही. 
 
सतरा ॲम्बुलेन्स गुल्‍या कुठे? 
माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी आपल्‍या टिकेचा बाण सोडला. जिल्ह्यात ॲम्बुलेन्स मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, की हा प्रश्‍न जी. एम.फांउडेशनला विचारायला हवा; कारण त्यांच्याकडे १७ ॲम्बुलेन्स असल्याचे सांगितले जाते. मात्र त्या आता कुठे आहेत. लाखो रूग्णांचे शिबीर घेतल्याचा ते दावा करीत होते. मात्र आता पाच ते सात हजाराच्या डिझेलच्या खर्चा करीता ते मागेपुढे का पाहत आहेत. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com