यामुळे केळीच्या मागणी घट...!

banana.jpg
banana.jpg

रावेर (जळगाव) : रमजानचा महिना संपून बाजारपेठेत आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे केळीचे भाव पुन्हा एकदा जमिनीवर आले आहेत. सध्या केळीला सव्वा तीनशे ते साडेतीनशे रुपये क्विंटल असा नाममात्र भाव मिळत असून दर्जेदार निर्यातक्षम केळीलाही चारशे ते साडेचारशे रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. 

रमजान महिना सुरू होण्यापूर्वी केळीचे भाव २५०-२७५ रुपये ते ४०० रुपये क्विंटल असे होते. रमजानच्या साधारण आठ दिवसाआधी केळीच्या भावात काहीशी वाढ होऊन ५०० ते ६०० रुपये क्विंटल भाव मिळाला. निर्यातक्षम केळीला विदेशात ७०० ते ७५० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. रमजान ईद नंतर मात्र कमालीची घसरण झाली असून, विदेशात ४५० रुपये क्विंटल असा भाव तर देशात ३२५- ३५० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. सध्या लॉकडाउन संपून देशातील जवळपास सर्वच बाजारपेठा उघडल्या. मात्र, आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने केळीला मागणी नसून भाव घसरल्याचे व्यापारी सांगतात. 

शासकीय यंत्रणेने लक्ष द्यावे 
नवी दिल्लीत ६० रुपये डझन आणि उत्तर भारतात सुमारे १०० रुपये डझन अशा भावाने केळी विकली जात असताना इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्याला ३०० ते ३५० रुपये भाव कसा मिळतो. याबाबत मार्केटिंग संबंधित सरकारी यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. सध्या बऱ्हाणपुर येथून दररोज शंभर ते सव्वाशे आणि आणि रावेर तालुक्यातून सव्वाशे ते दीडशे असे एकूण अडीचशे ते तीनशे केळी ट्रक्स उत्तर भारतात निर्यात होत असताना केळीला मागणी नाही असे कसे म्हणता येईल. उत्पादन खर्च तरी भरून निघावा, असे भाव केळीला मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. 

केळीला निम्मेच भाव 
येथील बाजार समिती दररोज केळी भाव जाहीर करते. आज हे भाव ७०० रुपये क्विंटल फरक १० रुपये असे एकूण ७७० रुपये असे आहेत. प्रत्यक्षात केळीला त्याच्या निम्मेही म्हणजे ३५० रुपये क्विंटलचाही भाव मिळत नाही. काल (ता. १) बऱ्हाणपूर बाजारातील लिलावात केळीला सर्वाधिक भाव ४४० रुपये क्विंटल असा मिळाला. ईदनंतर दरवर्षी केळीचे भाव घसरतात असा अनुभव आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com