चीन, जपान कशी देतंय कोरोनाला मात...मग आपण सर्वांनी हे करायलाच हवं

steam coronavirus
steam coronavirus

जळगाव : कोरोना व्हायरस हे शब्द उठता, बसता आणि झोपताना देखील कायम ऐकत आहे. हा व्हायरस इतका पसरलाय की प्रत्येकाच्या मनात एक भिती आहे. गेल्या चार महिन्यांपासून यावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय किंवा आयुर्वेदीक, होमिओपॅथी औषधी घेत आहे. घरगुती उपाय म्हणून गरम पाणी पिणे, गुडण्या करणे इतकेच नाही तर वाफ देखील घेतली जाते. पण हे कोरोनाला रोखण्यात कितपत मदत होतेय हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे. 


गरम पाणी पिणे, नियमित वाफ घेणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं जेवण जेवणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे ह्या गोष्टी काटेकोरपणे पाळलात तर आपण सुरक्षित राहू शकतो. परंतु, अनेकजण यांचे काटेकोरपणे पालन करण्याकडे दुर्लक्ष करत असतात. बाहेर फिरताना देखील अनेकांच्या तोंडाला मास्क लावलेला पाहण्यास मिळत नाही. पण अनेकजण घरच्या घरी उपाय करून संरक्षण करण्यावर भर देत आहेत. यात गरम पाणी पिणे आणि वाफ घेणे हे उपाय निश्‍चितच फायद्याचे असल्याचे तंज्ञाचे म्हणणे आहे.  

नाकात चार दिवस असतो व्हायरस 
श्वास नलिका आणि अन्न नलिका या दोन वेगळ्या आहेत. आपण जर नेहमी गरम पाणी पिऊन घशाची, अन्ननलिकेची सुरक्षा घेत असाल तर ते खूपच चांगले असून ती होतही असते. पण श्वसन मार्गाचे काय? असा प्रश्‍न कायम राहतो. पॅरानेझल सायन्स म्हणून नाकाच्या पाठीमागे एक हाड असते, त्याच्या मागे एक पोकळी असते, त्या पोकळीमध्ये संसर्गाचे जंतू जाऊन बसतात. तिथे एक प्रकारचे लॉकिंग मेकॅनिझम असते. त्यामुळे बाहेरील जंतू जाऊन प्राथमिकतः तिथे अडकतात. साधारण चार दिवस हा संसर्ग अडकलेला असतो. 

म्हणूनच वाफ घेणे आहे आवश्‍यक 
नाकाच्या मागील हाडात असलेल्या पोकळीत अडकलेला संसर्ग तिथून चार दिवसांनी फुप्पुसांपर्यंत पोहोचतात. सुरवातीला तिथल्या जंतूंच्या वास्तव्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत नाही. परंतु तिथून चार दिवसांनी फुप्पुसांपर्यंत पोहोचल्यानंतर श्वास घेण्यास त्रास व्हायला लागतो. जर त्या जंतूंना पॅरानेझल सायन्समध्येच मारायचे असेल, तर स्टीम (वाफ) घेणे अती आवश्‍यक आहे. कारण आपण जे गरम पाणी पितो ते तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. 

चीन, जपाननेही अवलंबला पर्याय 
साधारणपणे 40 डिग्री सेन्टीग्रेडची वाफ व्हायरसला पांगळा करते. 60 डिग्री सेन्टीग्रेडची वाफ ही व्हायरसला पांगळी करते, आणि रोगप्रतिकारक शक्ती त्याला मारू शकते. 70 डिग्री सेन्टीग्रेडची वाफ व्हायरसला पूर्ण पणे मारते. संपूर्ण चीन, जपान, हॉंगकॉंग हा स्टीमवर आहे. परंतु, भारतात त्याचा प्रचार का होत नाही. 

कशी घ्यायची वाफ 
श्वास नलिकेतून संसर्ग थेट फुप्पुसांपर्यंत पोहचतो, म्हणून स्टीम घेणे कायम फायदेशीर आहे. वाफ कशी घ्यायची? याबद्दल जाणून घेवूयात. जर घरातच असाल तर एकदा वाफ घ्यायची. भाजी किंवा काहीही खरेदी करायला बाहेर जात असाल तर दोन वेळेस वाफ घ्यायची. तसेच लोकांना ऑफिसमध्ये भेटत असाल तर तीनदा घ्यावी. त्याचप्रमाणे कोणी थेट कोविड रुग्णाची काळजी घेत असेल किंवा संपर्कात असेल तर दर दोन तासांनी वाफ घेणे अती आवश्‍यक आहे. तर आता आपणच आपली काळजी घ्यायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com