esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

crime

प्रेम एकीशी अन्‌ विवाह दुसरीशी..आरोग्याधिकारी तरुणीची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी, तसेच आरोग्याधिकारी (हेल्थ ऑफिसर) (Health Officer) म्हणून कार्यरत तरुणीशी ओळखी करून तिला लग्नाची मागणी घालत थेट पाच वर्षे तिचे शोषण केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेला पत्नीप्रमाणे वागवत लाखो रुपये उकळून घेत दुसरीकडेच लग्न (Wedding) करून घेतल्यावरही अत्याचार सुरूच होते. या प्रकरणी जिल्‍हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा कर्मचारी संपत लक्ष्मण मल्हाड (रा. दरीबडचा, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची ( Midc Police Case)नोंद केली आहे.

हेही वाचा: एफआरपी न मिळू देण्याचा पवारांचा कुटिल डाव-सदाभाऊ खोत


जळगाव जिल्‍हा सामान्य रुग्णालयात २०१८ मध्ये नोकरीवर नियुक्त झालेला संपत लक्ष्मण मल्हाड याची २०१६ मध्ये मिरज (जि. सांगली) येथे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक तरुणीशी ओळख झाली. ओळखीनंतर त्याने लग्नाची मागणी घातल्याने दोघांच्या भेटीगाठी होऊन संपतने या तरुणीसोबत बळजबरी करून शरीरसंबध प्रस्‍थापित केले. ‘लग्न तुझ्याशीच करेन,’ असे वारंवार आश्वासने देत वेगवेगळी कारणे देत सतत पाच वर्षांपासून या तरुणीकडून पैसे उकळत राहिला. मार्च २०२० मध्ये संपत मल्हाड याने परस्पर लग्न करून घेतल्याचे पीडितेला कळाल्यावर तिने दूर राहणे पसंत केले. मात्र, तरीसुद्धा तिला गाठून ब्लॅकमेलिंग करत त्याने शरीरसंबध ठेवले. पीडितेच्या आर्थिक लुबाडणुकीसह तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिने तक्रार दिली. संपत लक्ष्मण मल्हाड याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.

हेही वाचा: गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल


जळगावी बोलावून अत्याचार
पीडितेवर गेली पाच वर्षे अत्याचार करून तिने नोकरी करून गोळा केलेल्या आर्थिक संपत्तीची लूट करूनही संपत थांबला नाही. त्याने प्रशिक्षण कालावधीत पीडितेवर सांगली, औरंगाबाद, डेक्कन रोड, पुणे, त्यानंतर जळगावी बोलावून घेतले. संशयिताचे लग्न झाल्याने पीडितेस नकार दिल्यावर तिला मारझोड करून अत्याचार केला. जळगाव जिल्हा रुग्णालयात नोकरीस लागल्यानंतर एक वेळेस ३५ हजार, परत ७० हजार रुपये लुबाडले.

loading image
go to top