
कोरोना संक्रमणाची दाट शक्यता आहे. त्याचा प्रभाव दिवाळी संपल्यानंतर सुरू होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, डेडीकेटड कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आले आहेत.
कोरोना’ दुसऱ्या टप्प्यासाठी जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज !
जळगाव ः कोरोना संसर्गाची लाट दुसऱ्या टप्प्यात दिवाळीनंतर येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, चौदा हजार पाचशे बेड रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आले आहेत.
आवश्य वाचा- मुख्यमंत्री केवळ माझं कुटूंब..’चा टेप वाजवताय, आतातरी कृती करा-चित्रा वाघ
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाची लागण झाली. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेने अत्याधुनिक आरोग्य सुविधा देत ५१ हजार ८३० जणांना या व्याधीपासून बरे केले. मात्र उशिराने दाखल झालेल्या किंवा अगोदरच व्याधी असलेल्या त्यात कोरोना झालेल्या एक हजार २७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५२७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. गेल्या महिनाभरापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. आरोग्य यंत्रणेतर्फे दररोज दोन ते अडीच हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यात अतिशय कमी संख्येने बाधित आढळत आहेत.
दुसरीकडे मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिवाळीनंतर अनेक नागरिक परजिल्हा, राज्यातून जळगाव जिल्ह्यात येतील किंवा येथील बाहेर जातील. यात कोरोना संक्रमणाची दाट शक्यता आहे. त्याचा प्रभाव दिवाळी संपल्यानंतर सुरू होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, डेडीकेटड कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आले आहेत. सर्वच ठिकाणी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, पीपीइ किट, इतर सुविधांची तयारी करण्यात आली आहे. जर रुग्णसंख्या वाढली तर एकावेळी १४ हजार रुग्णांवर उपचार करता येणार आहेत.
...अशी आहे सज्जता
- १४ हजार बेड्स उपलब्ध
- दोन हजार ऑक्सिजन बेड
- ५०० आयसीयू बेड
- ३४० व्हेंटिलेटर
...आकडे बोलतात
एकूण रुग्णसंख्या : ५३ हजार ६२९
बरे झालेले : ५१ हजार ८३०
एकूण मृत्यू : एक हजार २७२
ॲक्टिव्ह रुग्ण : ५२७
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आहे. १४ हजार ५०० बेड आम्ही तयार केले आहेत. नागरिकांनी मास्क लावला, गर्दीत जाणे टाळले, स्वयंशिस्त पाळली तर ही लाट येणार नाही.
-अभिजित राऊत (जिल्हाधिकारी)
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांत कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. लाट आली तर आम्ही अत्याधुनिक सुविधा देत रुग्णांवर उपचार करू.
-डॉ. एन. सी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव
संपादन- भूषण श्रीखंडे
Web Title: Marathi News Jalgaon Health System Alerted Coronas Second Phase
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..