esakal | शहरात हॅाकर्स, विक्रेत्यांचे अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याची मोहिम सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात हॅाकर्स, विक्रेत्यांचे अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याची मोहिम सुरू 

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत 19 हजारांच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

शहरात हॅाकर्स, विक्रेत्यांचे अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याची मोहिम सुरू 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हॉकर्स,भाजीपाला विक्रेते,शॉप कि पर्स,किरकोळ विक्रेते यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार मनपाच्या चौबे शाळेत पहिल्याच दिवशी 180 विक्रेत्यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात तीन विक्रेत्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तपासणी मोहीमेला सुरुवात
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विक्रेत्यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट तपासणी मोहीमेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विक्रेत्यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. यावेळी महापौर भारती सोनवणे,आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे,  आयुक्त सतीश कुलकर्णी,उपायुक्त संतोष वाहुळे,नगरसेवक कैलास सोनवणे,विशाल त्रिपाटी,डॉ.संजय पाटील उपस्थित होते.

विक्रेत्यांनी स्वंयस्फूर्तीने तपासणी करावी
शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत 19 हजारांच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी महापौर भारती सोनवणे यांनी शहरातील सर्व विक्रेत्यांसाठी अ‍ॅन्टीजन  टेस्ट करण्याची मागणी केली होती.त्यानुसार  मनपा प्रशासनाने तपासणीचा निर्णय घेतला आहे.  बुधवारी पहिल्या दिवशी 180 विक्रेत्यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात असून तीन विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. शहरातील हॉकर्स,भाजीपाला विक्रेते, शॉप किपर्स,किरकोळ विक्रेत्यांनी  30 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत मनपाच्या चौबे शाळेत अ‍ॅन्टीजन टेस्ट करावी असे आवाहन मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी  केले आहे. विक्रेत्यांनी स्वंयस्फूर्तीने तपासणी करावी. अन्यथा व्यवसाय करु देणार नाही असा इशारा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिला आहे.

loading image
go to top