गर्भवती पत्नीला दवाखान्यात नेले अन्‌ तासाभरात घरात चोरी

रईस शेख
Saturday, 28 November 2020

शिवाजीनगर विस्तारीत परिसरातील अमन पार्क- अस्मानिया पार्क परिसरात फकिरा खान उस्मान खान कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. शुक्रवार(ता.२७) रेाजी गर्भवती पत्नी शमिना यांच्या तपासण्यांसाठी सकाळी साडे अकराच्या सुमारास खान दाम्पत्य घरबंद करुन रुग्णालयात गेले होते.

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क परिसरातील भंगार व्यवसायीक फकिरा खान उस्मान खान यांचे बंद घर फोडून चेारट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. फकिरा यांची पत्नी शमिना यांच्या सोबत घरबंद करुन रुग्णालयात गेले असतांना चोरट्यांनी भरदिवसा अवध्या दिडच तासात बंदघरफोडून घरफोडी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

शिवाजीनगर विस्तारीत परिसरातील अमन पार्क- अस्मानिया पार्क परिसरात फकिरा खान उस्मान खान कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. शुक्रवार(ता.२७) रेाजी गर्भवती पत्नी शमिना यांच्या तपासण्यांसाठी सकाळी साडे अकराच्या सुमारास खान दाम्पत्य घरबंद करुन रुग्णालयात गेले होते. दवाखान्याचे काम अटोपुन ठिक एक वाजता देाघेही घरी परतले. घराच्या मुख्य दाराचे कुलूप कापलेले हेाते, आत जाऊन बघताच आतील खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले लोखंडी कपाटाची तिजोरी उघडून चोरट्यांनी आतील सोने चांदिचे दागिने व एक लाख रुपये रोख असा ऐवज लंपास केल्याचे आढळून आहे. 

कर्जाचे एकलाख लांबवले. 
फकिरा शेख यांनी भंगार व्यवसाया करीता महिंद्रा फायनान्स करुन १ लाख रुपये पर्सनल लोन केले होते. कर्जाची रक्कम आणुन घरी ठेवली आणि चोरट्यांनी चोरुन नेल्याचा घात झाला. 

असा ऐवज लंपास 
१ लाख रुपये रोख 
३१ हजार २८७ रुपयांची सेान्याची रिंग (९.३८० ग्रॅम) 
२२ हजार ५६५ मनी पोत (६५.८० ग्रॅम) 
६० हजार रुपयांची पांचाली पेात (२०ग्रॅम) 
९ हजार रुपयांची ३ग्रॅम अंगठी 
१५ हजार ५७० रुपये ५ भार चांदिचे पैंजण 
१ हजार २६० नाकातील सेान्याची नथ 
४ हजार ७२८ सोन्याचे टॉप्स 
एकुण २ लाख ४४ हजार ४१० 
 
संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon husband wife going hospital and one hour house robbery