सुरू झाला ‘बिग बटरफ्लाय मंथ’; फुलपाखरांची येथे मिळते माहिती ! 

भूषण श्रीखंडे
Monday, 14 September 2020

बिग बटरफ्लाय मंथ’ हा कार्यक्रम म्हणजे एक मोहिम आहे. फुलपाखरांना सर्वसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचवण्याची यासाठी देशातील ३० पेक्षा जास्त संस्थेचे सदस्य कार्यरत आहे.

जळगाव ः फुलपाखरू निसर्गाची अत्यंत सुंदर व नाजूक निर्मिती असून ते दिसताच प्रत्येकाचे मन हे ‘छान किती दिसतेय फुलपाखरू’ हे एक गाणे गुणगुणतोचं.  बहुसंख्य माणसांना तसेच लहान मुलांना फुलपाखरू आकषीर्त करते. अनेकांना तर फुलपाखरू हे किटक आहे अजूनपर्यंत मुळात माहीत नाही, फुलपाखराचे जीवन कसे असते ? त्यांचे आयुष्य किती असते? ते कुठे राहतात? असे प्रश्‍न सर्वसामान्य माणसांना पडतात. मात्र त्यांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न कमी झाला. त्यामुळेच इतर वन्यप्राणी व पक्षी याबद्दल आज सर्वसामान्यांना बऱ्यापैकी माहिती आहे ती फुलपाखरू बाबत नाही. 

दहा वर्षापासून सुरू झाले कार्य
मागील साधारणपणे दहा वर्षांपासून भारतात आणि महाराष्ट्रात काही व्यक्ती व संस्था फुलपाखरांसाठी कार्य करीत आहेत. मात्र त्यांचेही कार्य मर्यादीत स्वरूपाचे आहे आणि त्याला अनेक मर्यादा आहेत. मात्र फुलपाखरांबाबत व्यापक स्वरुपात कार्य झाले पाहिजे, अधिकाधिक व्यक्तींपर्यंत ते पोहोचले पाहिजे आणि फुलपाखरांची सद्यःस्थिती, त्यांचे त्यांच्या रहिवासी अधिवासाचे संरक्षण संवर्धन व्हावे म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेषतः मागील पाच वर्षांपासून याला गती आली. मागील तीन वर्षापासून पूर्वोत्तर भारतातील काही संस्था, देशातील फुलपाखरांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना वर्षातून एकदा एकत्र आणण्याकरीता ‘बटरफ्लाय मिट’ वा ‘बटरफ्लाय फेस्टीव्हल’चे आयोजन करत आहेत. परंतु, त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे देशभर कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना जास्तीत जास्त संख्येने एकत्र आणून काही प्रयत्न केले गेले पाहिजेत. 

संकल्पना अशी आली पुढे 
बिग बटरफ्लाय मंथ’ (BBM) काय आहे,  BBM म्हणजेच ‘बिग बटरफ्लाय मंथ’?. ‘बिग बटरफ्लाय मंथ’ हा कार्यक्रम म्हणजे एक मोहिम आहे. फुलपाखरांना सर्वसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचवण्याची यासाठी देशातील ३० पेक्षा जास्त संस्था. त्यांचे सदस्य, एकत्र येऊन कार्य करीत आहेत. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणजेच संपूर्ण सप्टेंबर महिना, हाच आहे. ‘मंथ’, आणि संपूर्ण सप्टेंबर महिना फुलपाखरांसंबंधी अनेक कार्यक्रम, स्पर्धा, यांचे आयोजन देशभरातील प्रमुख ३० पेक्षा अधिक संस्था करणार आहेत. तसेच हे कार्यक्रम आपापल्या भागातील विद्यार्थी, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक, प्रसार माध्यमे यांच्यापर्यंत मोठ्या संख्येने आणि जास्तीत जास्त परिणामकारकपणे पोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एकत्रितपणे काम करणाऱ्या ३०  संस्थांतर्फे राष्ट्रीय स्तरावर काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर आपापल्या भागात राज्यात या संस्था स्थानिक वा राज्य पातळीवर काही स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करतात.  

अशा असतात स्पर्धा
राष्ट्रीय पातळीवर छायाचित्र चलचित्र, स्पर्धा, ओरीगामी स्पर्धा, बटरफ्लाय रेस, बटरफ्लाय काऊंट, तज्ज्ञांची भाषणे, प्रश्नमंजूषा, शब्दकोडे, वेबिनार्स, फुलपाखरांचे ‘जीवनचक्र स्पर्धा’ यांचे बिग बटरफ्लाय मंथ मध्ये आयोजन करण्यात येत आहे. यात राष्ट्रीय स्तरावर सहभागी असलेल्या संस्थेचे सदस्य, अभ्यासक, फुलपाखरू प्रेमी व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेतली जाते. 

जळगाव जिल्ह्यात या संस्था
जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेली ‘न्यु काँझर्व्हर- जळगाव’ ही संस्था १९९६ सालापासून स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर कार्यरत विश्‍व प्रकृती निधी- भारत (W. W. F.-India), वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (W. P.S. I.), बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (B.N.H. S.), सातपुडा फाउंडेशन, महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्याबरोबर राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेते. तसेच १९९५-१९९६ सालापासून संस्थेतर्फे जिल्ह्यात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या नोंदी घेण्याचे कार्य सुरू आहे. 

परमेश्‍वराची अद्भुत मशिन 
अंतराळशास्त्राचे प्रख्यात डिझाइन इंजिनिअर श्री ज्युल्स पेरीअर त्यांच्या मतानुसार ‘फक्त तो महान निर्माताचे (परमेश्‍वर) एव्हढे आश्‍चर्यकारक उडते सयंत्र (फ्लाईंग मशिन)अने निर्माण करू शकतो.’ अर्धा ग्रॅम वजनाच, केवळ अल्पशा द्रवरुपी इंधनावर चालणार आणि ३००० कि. मी. पर्यंत प्रवास करू शकणार मशिन तयार करायला आमच्या विज्ञानाला अजून क शतके लागतील असे मत व्यक्त केले आहे. 

फुलपाखरू हे दिसायला जेवढे आकर्षक असते तेवढे त्याच्याबद्लल मनुष्यास माहिती नाही. त्यामुळे फुलपाखरूवर संशोधन तसेच नागरिकांपर्यंत जास्त याची माहिती पोहचविण्याचा मुळे उद्देश हा बिग बटरफ्लाय मंथ’चा आहे. त्यामुळे या एक महिन्याच्या कालावधीत हा जास्ती जास्त वन्य, किटक संशोधन तसेच फुलपाखरू प्रेमींनी सहभाग घ्यावा.   
 
- अभय प्र. उजागरे,जळगाव, अध्यक्ष न्यु काँझर्व्हर- जळगाव फाऊंडर पार्टनर ‘द नेमफिलिस्ट’ पुणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Information on the Big Butterfly Month campaign