
गुलाबी थंडीत चहा प्यायची मजा काही वेगळीच असते. थंडी आणि चहा हा जणू काही दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. आज नुसता टपरीवर मिळणारा चहाच नाही तर अनेक प्रकारचे चहा मिळतात.
जळगाव : चहाला वेळ नसतो तर वेळेला चहा असतो. याच गरमागरम आणि स्वादिष्ट पेयाने आपल्या दिवसाची सुरुवात होते. मग हिवाळा, पावसाळा असो की उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये गरम चहाचा कप ओठांना लावून सुरका मारणारे ‘चहा’त्यांना नक्कीच आवडते. पण या चहाचा प्रवास अगदी घरातील गुळाची चहा म्हणा की टपरीवरील कटींगपासून शॉपरूपी झालेल्या अमृततुल्य कपापर्यंतचा. हे जाणून घेवून आजच्या आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्ताने.
गुलाबी थंडीत चहा प्यायची मजा काही वेगळीच असते. थंडी आणि चहा हा जणू काही दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. आज नुसता टपरीवर मिळणारा चहाच नाही तर अनेक प्रकारचे चहा मिळतात. चहाचा पिण्याचा आनंद तसा रोज लूटतो. सकाळ आणि दुपारचा चहा न चुकता घेतलाच जातो. चाकरमानी तर टपरीवर चहा प्यायला येवून उभा राहतोच. अर्थात चहाचा एक प्याला घेतला की मूड फ्रेश होतो.
रंगू लागल्या चाय पे चर्चा
शरीराला हानिकारक असला तरी चहा तसा अनेकांच्या आवडीचे पेय. पाण्यानंतर भारतात सर्वाधिक पिले जाणारे पेय मानले जाते. चहा हा आळस घालवून मूड फ्रेश करतो, आणि तरतरी येते असे चहा पिणाऱ्या शौकिनांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंटाळा आला की, निघाले चहा प्यायला. मग काय कटिंग स्पेशल चहा मारता मारता चर्चा रंगू लागते.
चहाचा शोध कोठे लागला
चहाचा शोध नेमका कोठे लागला हे सांगणे जरा कठीण. तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळून येत असल्याचे सांगितले जाते.
उभे राहिले अमृततुल्य
गाडीवर मिळणारा कटिंग ते सीसीडीमध्ये मिळणारा हाय टी अशी चहाची कितीतरी रूपं. पण चहाची टपरी चालविणारा म्हटले की जरा कमी आणि गरीबीतला मनुष्यासाठी उत्पन्नाचे साधन मानले जाते. पण आज ही संकल्पना बदलली आहे. पुण्यातून चहाची अमृततुल्य कल्पकता उदयास आली आणि ती महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शहरामध्ये पसरली आहे. पुण्यातल्या या अमृततुल्य चहाची चव चाखायला अगदी मोठे प्रशस्त शॉप घेवून त्यात प्रमुख एसी, फ्रिजसाठीची गुंतवणूक करून विविध शहरांमध्ये शाखा सुरू केल्या. म्हणून पुणेरी अमृततुल्य असे नाव देवून कटींग नव्हे तर अगदी मोठा कप भरूनच तेथे चहा पिण्याचा आनंद घेतला जातो.
सीटीसी चहा
सीटीसी चहा म्हणजे आपण दररोज घरात, हॉटेल, किंवा एखाद्या टपरी वर पितो असा चहा. हा चहा बाजारात वेगवेगळ्या ब्रॅंडमध्ये उपलब्ध आहे, चहाची पान सुकवुन त्यांना दाणेदार स्वरुप दिल जात. त्यानंतर काही बदल होऊन चहाची चव आणि सुगंध वाढतो. मात्र हा चहा ग्रीन टी इतका नैसर्गिक राहत नाही.
ग्रीन टी
या चहावर प्रक्रिया केली जात नाही. रोपाच्या वरच्च्या कच्चा पानांपासून हा चहा तयार केला जातो. पाने सरळ तोडुन गरम पाण्यात टाकुन आपण हा चहा बनवु शकतो. या चहात अंटी ऑक्साईटचे प्रमाण अधिक असल्याने हा चहा आरोग्यासाठी लाभदायी ठरतो. हा चहा दुध आणि साखर न घालता प्यावा. या चहा पासूनच हर्बल आणि ऑर्गानिक चहा बनतो.
लेमन टी
लिंबाचा रस घातलेला चहा आरोग्यासाठी प्रामुख्याने पोटासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे ऑंटिऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाही, ते लिंबाच्या रसा मुळे मिसळले जातात.
मशीनचा चहा
अनेक ऑफिसेस, विमानतळ, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी या चहाच्या मशीन ठेवलेल्या असतात. य़ा मशिनमध्ये पैसे टाकल्यास चहा मिळतो मात्र या चहाची चव सगळ्यांनाच तितकिशी आवडच नाही. चहा पिल्याचे समाधान या चहातून मिळत नाही. त्याचे कारण म्हणजे या चहात कोणताही नैसर्गिक घटक नसतो.
हर्बल टी
ग्रीन टी मध्ये तुळस, अश्वगंधा, वेलदोडे, दालचिनी वगरे घालुन हर्बल चहा बनवला जातो. सर्दी चहासाठी हा चहा गुणकारी ठरतो, तसेच औषध म्हणूनही हा चहा पिला जातो. बाजारात तयार पाकिटात हर्बल टी मिळतो.
ब्लॅक टी
कोणताही चहा दुध किंवा साखर न घालता प्यायल्यास त्याला ब्लॅक टी म्हणतात. ग्रीन आणि हर्बल चहा दुध न घालता पिला जातो. साधारण पणे कोणताही चहा ब्लॅकटी स्वरुपात पिणे चांगले असते.
इंस्टंट चहा
या प्रकारात टी बॅग्ज येतात. पाण्यात घाला आणि लगेच चहा तयार करा, टी बॅग्जमध्ये टॅनिक असिड असते. हे नैसर्गिक अस्ट्रीटेट असून यात जिवाणू आणि विषाणू रोधक गुण असतात. या गुणांमुळेच या टि बॅग्स सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील वापरल्या जातात.