esakal | जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात

जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (CORONA) संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत असून, नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या (Patient) अधिक असल्याने सक्रिय रुग्ण आता अवघे चारशेच्या टप्प्यात आले आहेत. सोमवारी नव्या १५ रुग्णांची नोंद झाली, तर ६८ रुग्ण बरे झाले.

(jalgaon district corona positive patient numbers low)

हेही वाचा: Photos:कच्चे पनीर खा..आणि लठ्ठपणा दुर करा!

जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागला आहे. रोज आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या कमी व बरे होणारे अधिक, असा ट्रेंड एप्रिलअखेरपासून आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सोमवारी तीन हजार ९४९ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी १५ बाधित आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ३७६ झाली आहे, तर ६८ रुग्ण दिवसभरात बरे झाले. बरे होणाऱ्यांची संख्या एक लाख ३९ हजार ४०३ वर पोचली आहे. २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

लक्षणे असलेले अधिक

सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊन ती सद्य:स्थितीत ४०० वर आली आहे. मात्र, असे असले तरी या टप्प्यात प्रथमच लक्षणे असलेले रुग्ण अधिक म्हणजे २६५, तर १३५ रुग्ण लक्षणे नसलेली आहेत. ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या १४०, तर आयसीयूमध्ये ५९ रुग्ण आहेत.

हेही वाचा: नगरसेविकेच्या बनवाट स्टॅम्पच्या अधारे ‘आधार’चा धंदा

भडगाव, बोदवड कोरोनामुक्तीकडे

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या घटली असून, दोनअंकी संख्येत आहेत. भडगाव व बोदवड तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून, या तालुक्यात सक्रिय रुग्ण प्रत्येकी पाच आहेत. सोमवारी भुसावळ- एक, अमळनेर- एक, धरणगाव- एक, एरंडोल- एक, पारोळा- एक, चाळीसगव- नऊ, अन्य जिल्ह्यातील एक असे रुग्ण आढळले.

loading image