उत्तर महाराष्ट्रात भाजपला बसणार आणखी मोठा झटका ? वाढदिवसाच्या जाहिरातीतून दिले नेत्याने संकेत

भूषण श्रीखंडे
Friday, 11 December 2020

भुसावळ शहरात तसेच सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी शुभेच्छा पोस्टरवर , वृत्तपत्रात जाहिराती दिल्या आहे. यात अनेक जाहिराती व पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो लावलेला असल्याने राजकीय चर्चेला ऊत आला आहे. 

जळगाव ः भाजपला रामराम करून एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून नविन राजकीय इनिंग सुरू केली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह खानदेशात भविष्यात मोठे राजकीय उलथापालथ होईल असे बोलले जात आहे. त्याचाच प्रत्यय आता दिसू लागला असून भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे हे खडसे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या जाहिरीती, पोस्टरवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोटो लागले आहे. तर भाजपचे माजी मंत्री गिरीश यांचा फोटो नसल्याने जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

आवश्य वाचा- भाजपच्या धर्तीवर राष्ट्रवादीचीही आता पक्षबांधणी 

एकनाथ खडसेंनी भाजप पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यावर खानदेशात मोठी राजकीय उलथापालथ होईल असे बोलले जात होते. याचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षात भाजचे खडसे समर्थक नेते, कार्यकर्ते जाण्याची चर्चा आहे. अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत देखील प्रवेश केला. त्यात आमदार संजय सावकारे हे खडसे समर्थक असून परिचित असून त्यांचा आज वाढदिवशी भुसावळ शहरात तसेच सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी शुभेच्छा पोस्टरवर , वृत्तपत्रात जाहिराती दिल्या आहे. यात अनेक जाहिराती व पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो लावलेला असल्याने राजकीय चर्चेला ऊत आला आहे. 

वाचा- कृषी विद्यालयातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ 

बॅनर, जाहिरातींवरून गिरीश महाजन आऊट
भाजप आमदार सावकारांचे शुभेच्छा पोस्टरवर , जाहिरातींवर एकनाथ खडसेंचा, रक्षा खडसेंचा तसेच जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांचा फोटो आहे. मात्र भाजपचे नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे अन्य नेत्यांचे फोटो नाही. 

सावकारे पुन्हा राष्ट्रवादीत ?
आमदार संजय सावकारे हे आधी राष्ट्रवादीत होते त्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यांना भाजप मध्ये आणले होते. आता खडसे राष्ट्रवादीत गेल्याने खडसे समर्थक आमदार सावकारे राष्ट्रवादीत पुन्हा जातील अशी आधी चर्चा होती. त्यात आज वाढदिवशी जाहिराती, पोस्टर वरून सावकारे पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत जाणार असल्याचे संकेत दिसून आले आहेत.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Khadse's photo appeared on a BJP MLA's post sparking a discussion of political developments