esakal | रेल्वे किमेनची सतर्कता आणि धाडसामूळे मोठी दुर्घटना टळली..!
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

रेल्वे किमेनची सतर्कता आणि धाडसामूळे मोठी दुर्घटना टळली..!

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : येथील रेल्वे यार्डात (Railway yard) गस्तीवर असलेले चाबीदार (किमेन) बबलू शेख यांना लाईन बदलविणारा टंगरेल तुटलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी लागलीच याची माहिती यार्ड व्यवस्थापकांना फोन करुन दिली. तसेच त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने मालगाडी येत होती. यावेळी शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता, लाल बावटा दाखवून गाडी थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत, मध्य रेल्वेने 'महाप्रबंधक सुरक्षा पुरस्काराने' (General Manager Security Award) जाहीर केला आहे.

हेही वाचा: फायर अलार्ममुळे टळली रेल्वे हॉस्पिटलमधील आगीची दुर्घटना!बबलू शेख यांना 6 सप्टेंबर रोजी मुंबईत मध्य रेल्वे 'महाप्रबंधक सुरक्षा पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे. बबलू शेख हे ३१ आगस्टला चाबीदार गस्ती ड्यूटीवर असताना भुसावळ यार्डातील किलोमीटर खंबा 446/20-22 च्या पाँईंट नंबर 215-ए मधील लाईन बदलविणारा टंगरेल त्यांना तुटलेल्या अवस्थेत आढळला. बबलू शेख यांनी या घटनेची माहिती मोबाईल वर ताबडतोब भुसावळ यार्ड सेक्शन इन्चार्ज श्याम वाघमारे यांना दिली.

हेही वाचा: लस टोचल्यानंतर वृद्ध जागीच कोसळला..!‌

मोठी दुर्घटना टळली..

त्याचवेळी त्या लाईनवर येणारी मालगाडी बबलू शेख यांनी लाल बाबटा दाखवून थांबविली. बबलू शेख यांनी सजगपणे, तत्परतेने गाडी रोखल्याने रेल्वेची होणारी मोठीं वित्तहानी टळली. बबलू शेख यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना 'महाप्रबंधक सुरक्षा पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे. बबलू शेख यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आणि त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल रेल्वे कर्मचारी ट्रेक मेंटेनर्स असोसिएशन (आरकेटिए) चे मंडळ अध्यक्ष प्रकाश जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

loading image
go to top