esakal | फायर अलार्ममुळे टळली रेल्वे हॉस्पिटलमधील आगीची दुर्घटना!
sakal

बोलून बातमी शोधा

फायर अलार्ममुळे टळली रेल्वे हॉस्पिटलमधील आगीची दुर्घटना!

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस मेमोरिअल रेल्वे हॉस्पिटलमध्ये बुधवारी (ता. १) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

फायर अलार्ममुळे टळली रेल्वे हॉस्पिटलमधील आगीची दुर्घटना!

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : मध्य रेल्वेच्या (Central Railway) सोलापूर विभागातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस मेमोरिअल रेल्वे हॉस्पिटलमध्ये (Dr. Dwarkanath Kotnis Memorial Railway Hospital) बुधवारी (ता. १) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग (Fire) लागली. मात्र हॉस्पिटलमधील फायर अलार्म (Fire Alarm) वाजल्याने कर्मचाऱ्यांना आगीवर लगेच नियंत्रण मिळविता आले. यामुळे मोठी दुर्घटना (Accident) टळली.

हेही वाचा: दगडू ते सुशीलकुमार अन्‌ कोर्टातील पट्टेवाला ते केंद्रीय मंत्री!

सोलापूरच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस मेमोरिअल रेल्वे हॉस्पिटलमध्ये आगीची धक्कादायक घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या या हॉस्पिटलमध्ये बुधवारी (ता. १) सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे तेथील डॉक्‍टर आणि रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण यांच्यात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्मोक डिटेक्‍टर सुरू होऊन फायर अलार्म वाजल्याने कर्मचाऱ्यांना आग नेमकी कुठे लागली, याचा लगेच अंदाज आला व त्यांना आगीची तीव्रता कमी असतानाच आगीवर लगेच नियंत्रण मिळवता आले. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण हॉस्पिटल परिसरात खळबळ उडाली अन्‌ नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आगीची तीव्रता कमी असल्याने होणारा मोठा धोका टळला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणेच्या साहाय्याने लागलेली आग विझविण्यात कर्मचाऱ्यांना यश मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत इलेक्‍ट्रिक बोर्डाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, असे येथील डॉ. आनंद कांबळे यांनी सांगितले.

हेही वाचा: निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेला आमदार परिचारकांनी दिला खांदा

ठळक बाबी...

  • शॉर्ट सर्किटमुळे आगीची दुर्घटना

  • स्मोक डिटेक्‍टर सुरू होऊन फायर अलार्म वाजण्यास सुरुवात होते

  • फायर अलार्ममुळे समजू शकले आगीचे ठिकाण

  • जवळपास एक तासापर्यंत सुरू होता आग विझविण्याचा खटाटोप

  • अलार्म सिस्टिममुळे मालमत्तेचे आणि मौल्यवान वस्तूंचे नुकसान कमी

loading image
go to top