esakal | या वेळेतच आजारी पडा;एका पत्राची चर्चा,जाणून घ्या काय आहे प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Sick

या वेळेतच आजारी पडा;एका पत्राची चर्चा,जाणून घ्या काय आहे प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नागरिकांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेतच मरा किंवा आजारी (Sick) पडा, त्यानंतर मरू (Death) नका किंवा आजारीही पडू नका, पडले तर त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे, असे पत्र (Letter) येथील येथील आरटीआय (RTI) कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मिलिंद फुलपाटील ( Jalgaon District Hospital and Government College Dean) यांना दिले. सोबतच जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनाही हे पत्र देऊन डीन डॉ. फुलपाटील कशा प्रकारे कारभार करताहेत हेही दाखवून दिले आहे.

हेही वाचा: जळगावः रस्तेप्रश्नी कायदेशीर नोटिशीबाबत महापौर, आयुक्तांचे मौन

श्री. गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री आठला एक रुग्ण गंभीर असून त्यावर तातडीने उपचार करावेत अशी मागणी जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मिलिंद फुलपाटील यांना फोनवर केली होती. त्यावर डॉ. फुलपाटील यांनी मला कार्यालयीन वेळेतच फोन करा, इतर वेळी फोन करू नका असा सल्ला श्री. गुप्ता यांना दिला होता.

जबाबदारी टाळण्याचा प्रकार

त्यावर श्री. गुप्ता यांनी वरील आशयाचे पत्र डीन डॉ. फुलपाटील व जिल्हाधिकारी राउत यांना दिले आहे. डीन डॉ. फुलपाटील हे शासकीय रुग्णालयाचे प्रमुख असताना त्यांनी अशी उत्तरे देणे जबाबदारी टाळण्यासारखे आहे. जर रात्री अपरात्री मोठा अपघात झाला अन्‌ त्यावेळी डॉ. फुलपाटील यांना त्याची माहिती देऊन तातडीने मदतीची मागणी केली तर तेव्हाही असे उत्तर मिळणार का ? याबाबत डीन यांना जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा करावी, डॉ. फुलपाटील यांनी केवळ बेसीक वेतनच घ्यावे, इतर भत्ते, अलाउन्स घेऊ नये असाही सल्ला श्री. गुप्ता यांनी दिला आहे.

loading image
go to top