खेळता खेळता चिमुरडीचा मृत्‍यू; डोक्‍यावर पडल्‍याने दुखापत

खेळता खेळता चिमुरडीचा मृत्‍यू; डोक्‍यावर पडल्‍याने दुखापत
littel girl death
littel girl deathlittel girl death
Updated on: 

जळगाव : शहरातील गणपतीनगर येथे अडीच वर्षीय अवनी चव्हाण मुलीचा खेळत असताना डोक्यावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon-little-girl-death-in-play-ground)

littel girl death
जन्मतः दोन्ही पायाने अधू..काम करणारे हातही गेले; पत्‍नी कडेवर घेवून जाते तेव्हा..

गणपतीनगर येथे मध्य प्रदेशातील युवराज चव्हाण हे वॉचमन म्हणून कामाला आहे. काम करत असलेल्या ठिकाणीच ते वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांची अडीच वर्षांची मुलगी अवनी घराच्या कंपाउंडलगत खेळत होती. त्याच ठिकाणी एक चारचाकीही उभी होती. खेळता खेळता अवनी डोक्यावर पडली. तिच्या आवाजाने तिचे वडील व आईने धाव घेतली. तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात हलविले. गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी सचिन अहिरे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चिमुकली पडली कशी कळलेच नाही

नेमकी कंपाउंडवर चढताना अवनी खाली पडली की उभ्या असलेल्या चारचाकीवर चढताना खाली पडली, हे मात्र कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी व गुन्हे शोध पथकातील पोलिस नाईक रवींद्र पाटील यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com