जिल्ह्यातील मॉल्स, शॉपींग कॉम्पलेक्स ५ ऑगस्टपासून सुरू होणार ! 

देविदास वाणी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

नागरिकांना कोरोनाबाबत स्वयंशिस्तच पाळावी लागणार आहे. जर ती पाळली गेली नाही तर त्यांच्यासोबतच इतरांनाही कोरोनाचा त्रास सहन करावा लागेल. यामुळेच महापालिका, पालिका, जिल्हा परिषद गट क्षेत्रात नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव  ः शहरासह जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यापासून बंद असलेली सर्व व्यापारी संकुले, मॉल्स ५ ऑगस्टपासून अनलॉक (सुरू) करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण, आयुक्त सतीश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील सर्व कॉम्प्लेक्स, माॅल्स (सिनेमागृह, फुड कोर्टस, रेस्टॉरंट, वगळून) 
दूकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या दरम्यान सुरू ठेवता येतील. व्यापाऱ्यांना वस्तूंची विक्री करता येईल. मात्र सोशल डिस्न्टस, मास्क लावणे बंधनकारक आहे. 

सिनेमागृह, फॅड कोर्टस, रेस्टॉरंटमधील किचन सूरू ठेवता येतील. मात्र त्यांना ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी लागेल. दुकाने सुरू करण्याबाबत अधिक नियम, अटी, शतींबाबत येत्या सोमवारी (ता.३) सकाळी अकराला व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी राऊत, आयुक्त कुलकर्णी बैठक घेतील. त्यात सर्व नियमावली ठरविली जाईल. 

तर मार्केट बंद... 
व्यापार करताना गर्दी आढळली तर ५०० रुपये सर्वांनाच होणार आहे. सोबतच जर दुकानातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली तर सर्व व्यापारी कॉम्प्लेक्स बंद ठेवले जाणार आहे. यामुळे साेशल डिस्टन्स, माक्सचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

नागरिकांची स्वयंशिस्त महत्वाची 
नागरिकांना कोरोनाबाबत स्वयंशिस्तच पाळावी लागणार आहे. जर ती पाळली गेली नाही तर त्यांच्यासोबतच इतरांनाही कोरोनाचा त्रास सहन करावा लागेल. यामुळेच महापालिका, पालिका, जिल्हा परिषद गट क्षेत्रात नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांचा आता सर्वांवर वाच असेल ती दंड करतील, वेळप्रसंगी वाहनेही जप्त करतील. 

मका खरेदीच टार्गेट पूर्ण 
शासनाचे मका खरेदीचे टार्गेट पूर्ण झाल्याने आजदूपारीच मक्याची शासकीय खरेदी बंद करण्यात आली आहे अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिली. 

९ लाखांचा दंड वसूल 
शहरात मागील महिन्यात लावला गेलेला सात दिवसांच्या जनता कर्फ्यूमध्ये नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून महापालिकेने ९ लाख ५० हजारांचा दंड वसूल केला आहे.अशी माहिती आयुक्त कुलकर्णी यांनी दिली 

अशा असू शकतात दुकाने सुरू करण्याची अटी.. 
* सम/विषम तारखांना कॉम्प्लेक्समधील दुकाने बंद किंवा सुरू ठेवणे 
* काही दिवस ठरावीक वस्तंूचीच दूकाने सुरू ठेवणे 
* गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन डिलीव्हरीचा पयार्य 
* मास्कशिवाय सामान वस्तू न देणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Malls, shopping complexes in the district will start from 5th August