सभा, मेळाव्यांसाठी केवळ आता पन्नास जणांची मर्यादा 

सचिन जोशी
Thursday, 3 December 2020

कार्यक्रम स्थळी उपस्थित नागरिकांनी चेहऱ्यांवर मास्क लावणे, सॅनेटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील व संबंधितांसाठी हात धुण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभा, मेळावे, मुलाखती व अन्य आनुषंगिक कामांसाठी ५० लोकांचीच मर्यादा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासंबंधी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत. 

वाचा- उद्योजकांसाठी चांगली बातमी: जळगावात ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक कार्यालय स्थापन होणार
 

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता, वेळोवेळी शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. खुले लॉन्स, विनावातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह अशा ठिकाणी व्याख्याने, मेळावे, मुलाखती, संस्थांच्या सर्वसाधारण सभा व अन्य आनुषंगिक कार्यक्रमांचे आयोजन केवळ ५० लोकांच्या मर्यादेत करता येईल.

परवानगी घेणे बंधनकारक राहणार नाही

संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या कार्यालयाकडून व अन्य कोणत्याही विभागाकडून वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. कार्यक्रम स्थळी उपस्थित नागरिकांनी चेहऱ्यांवर मास्क लावणे, सॅनेटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील व संबंधितांसाठी हात धुण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon meetings, gatherings only now limited to fifty people