esakal | चटई उद्योगाला बाजारपेठेची प्रतीक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

chatai udyog

जळगाव एमआयडीसीत डाळ उद्योग, पीव्हीसी पाइप, ठिबकच्या कारखान्यांसोबत चटई उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. कोरोना संसर्गामुळे देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 24 मार्च ते 14 एप्रिल या पहिल्या टप्प्यात डाळ उद्योग वगळता सर्वच उद्योग बंद होते.

चटई उद्योगाला बाजारपेठेची प्रतीक्षा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्गामुळे लॉकडाउनचे पाच टप्पे पूर्ण होत असताना एमआयडीतील प्रमुख उद्योगांची चाके रुळावर येऊ लागली आहेत. जळगाव एमआयडीसीत दीडशेवर युनिट असलेला चटई उद्योग प्रमुख मानला जातो. या युनिटपैकी 30 टक्के म्हणजे साधारण 40 ते 50 युनिट सुरू झाले असून अद्याप शंभरावर कारखाने बंदच आहेत. "अनलॉक'चा पहिला टप्पा सुरू असला तरी पूर्ण बाजारपेठ खुली झालेली नाही, त्यामुळे चटईला मागणी नसल्याने हे युनिट बंद असल्याचे सांगण्यात आले. 

आवर्जून वाचा - माझे पप्पा चालत गेले...परत आलेच नाही!; पितृछत्र हरपलेल्या मुलाचे अश्रू अनावर


जळगाव एमआयडीसीत डाळ उद्योग, पीव्हीसी पाइप, ठिबकच्या कारखान्यांसोबत चटई उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. कोरोना संसर्गामुळे देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 24 मार्च ते 14 एप्रिल या पहिल्या टप्प्यात डाळ उद्योग वगळता सर्वच उद्योग बंद होते. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये हे उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू होऊ लागले. आता चौथ्या टप्प्यात तर बहुतांश उद्योगांची चाके रुळावर आली आहेत. 

चटई उद्योगाला प्रतीक्षाच 
चटई उद्योगाचे दीडशेपेक्षा जास्त युनिट जळगाव एमआयडीसीत आहेत. यापैकी 30 टक्केच युनिट सुरू असून जवळपास शंभरावर युनिट अद्याप बंद आहे. मुळात चटई हे थेट बाजारपेठेत किरकोळ दुकानदार, विक्रेत्यांकडून विकले जाणारे उत्पादन आहे. सध्या "अनलॉक'च्या पहिल्या टप्प्यात बाजारपेठेतील काही भाग सुरू झाला असला तरी या उत्पादनाला मागणी निर्माण झालेली नाही. त्यामुळे मागणीच नसेल तर उत्पादन करून काय करणार? असा प्रश्‍न चटई उत्पादक उद्योजकांपुढे आहे. 

निर्यातक्षम मालाचे उत्पादन 
चटई उद्योगाचे जे कारखाने सुरू झाले आहेत, त्यापैकी बहुतांश कारखाने निर्यातक्षम माल तयार करतात. मुंबई मार्केटमधून त्यांना मागणी असते, त्याच उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यांचे प्रमाण 30 टक्केच असून 70 टक्के उद्योग अद्याप बंद आहेत. दिवाळीनंतर ते पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असे सांगितले जात आहे. 
 
परप्रांतीय कामगार अधिक 
चटई उद्योगात बहुतांश कामगार परप्रांतीय असून, ते उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, ओडिशा या राज्यांमधून आहेत. तर स्थानिक कामगारांची संख्या कमी आहे. परप्रांतीयांचे प्रमाण 65 ते 70 टक्के असून, स्थानिक केवळ 30 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. बहुतांश उद्योग बंद असल्याने परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे स्थानिक कामगारांवर भर आहे. आता काही कामगार परतू लागले आहेत. 

चटई उद्योग एकूण : 155 
परप्रांतीय कामगार : 65 ते 70 टक्के 
स्थानिक कामगार : 30-25 टक्के 
सध्या सुरू युनिट : 40 ते 50 

loading image