विद्यापीठात सुरू होणार संत मुक्‍ताई अध्‍यासन केंद्र

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठात आज कोवीडच्या धर्तीवर लांबलेल्‍या अंतीम वर्षाच्या परिक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने परिक्षा घेण्याबाबतच्या दिलेल्‍या निर्णयानुसार परिक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामंत आले होते

जळगाव : विद्यापीठात सुरू असलेल्‍या बहिणाबाई अध्यासन केंद्राच्या धर्तीवर संत मुक्‍ताई अध्यासन केंद्र सुरू करण्यात येईल. याबाबत बुधवारी मंत्रालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्‍थितीत होणाऱ्या बैठकीत याची घोषणा करणार असून यासाठी आवश्‍यक निधीची तरतुद देखील करण्यात येणार असल्‍याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठात आज कोवीडच्या धर्तीवर लांबलेल्‍या अंतीम वर्षाच्या परिक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने परिक्षा घेण्याबाबतच्या दिलेल्‍या निर्णयानुसार परिक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामंत आले होते. आढावा घेतल्‍यानंतर झालेल्‍या पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत उपस्‍थित होते. विद्यापीठात सुरू करण्यात येणाऱ्या संत मुक्‍ताई अध्ययन केंद्रासोबत संत वाड्यमय अध्यासन केंद्र देखील सुरू करण्यात येणार असल्‍याचे देखील त्‍यांनी सांगितले.

नियमित पदवीप्रमाणे प्रमाणपत्र  
विद्यापीठाच्यावतीने अंतिम वर्षाच्या परिक्षा ऑक्‍टोंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. या परिक्षा झाल्‍यानंतर पदवीप्रमाणपत्र प्राप्त विद्यार्‍थ्‍यांना नियमित पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल; त्‍यात कोविडचा उल्‍लेख नसेल. तसेच या परिक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्‍थ्‍यांना याच वर्षी म्‍हणजे नोव्हेंबरमध्ये परिक्षेची पुन्हा संधी उपलब्‍ध करून देण्यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon minister uday samant visit university start muktai adhasan center