
शहरातील २३ वर्षीय महिलेचा पती बेपत्ता झाल्याने ती एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेली. पोलिस ठाण्याबाहेर त्या महिलेची रवींद्र भगवान भडक याच्याशी ओळख झाली.
जळगाव : बेपत्ता झालेल्या पतीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या महिलेसोबत ओळख करुन पतीला शोधण्याच्या बहाण्याने व लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर वारंवार अत्याचार केले. त्यातून गर्भवती राहिलेल्या त्या महिलेचा गर्भपात करुन तिला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील २३ वर्षीय महिलेचा पती बेपत्ता झाल्याने ती एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेली. पोलिस ठाण्याबाहेर त्या महिलेची रवींद्र भगवान भडक याच्याशी ओळख झाली. पती शोधण्यास मदत करेल असे सांगत त्याने महिलसोबत जवळीक साधत तिच्यावर अत्याचार केला.
महिलेस घरही दिले भाड्याने
रवींद्रने सुरवातीस सोयगाव येथे नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून शिर्डी, अजिंठा, फर्दापूर येथे घेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच घर मालकाचे भाडे थकीत झाल्याने त्याने या महिलेस ओळखीने घरही भाड्याने मिळवून दिले होते.
गर्भपात करुन सोडले
रवींद्रने या महिलेस सर्व संसारोपयोगी साहित्य घेऊन देत आधार दिला. वारंवार अत्याचार झाल्यानंतर ती विवाहिता गर्भवती राहिली. त्यातून रवींद्रने गर्भपाताच्या गोळ्या आणून देत एका खासगी डॉक्टराकडून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी त्या महिलेने शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यादरम्यान महिलेच्या पतीचा शोध लागला. परंतु, त्याला या सर्व प्रकारची माहिती झाल्याने त्याने त्या विवाहितेला नांदविण्यास नकार देत तिला सोडून दिले.