संविधान हे जनताभिमुख असून, जनताच सार्वभौम आहे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

भारत एकसंघ राष्ट्र आहे, ही संकल्पना नव्या पिढीत रुजवून दृढ करणे गरजेचे आहे.

जळगाव  : भारतीय संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रास्ताविकेतूनच जो विचार दिला आहे, तो अत्यंतिक महत्त्वाचा आहे. संविधान हे जनताभिमुख असून, जनताच सार्वभौम आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन भारतीय संसदेची वाटचाल पुढे नेली पाहिजे, असे प्रतिपादन कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार यांनी येथे केले.
 

आवश्य वाचा-  जळगाव जिल्ह्याला १९ हजार नवीन लसी उपलब्ध; आजपासून १३ केंद्रांवर लसीकरण

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात ‘भारतीय संविधान आणि नागरिक’ या विषयावर आमदार रोहित पवार यांचे व्याख्यान झाले. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे अध्यक्षस्थानी होते. महापालिका शिक्षण समितीचे सभापती प्रा. डॉ. सचिन पाटील, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

संविधानाचा अर्थ समजावून घेणे गरजेचे

याप्रसंगी आमदार पवार म्हणाले, की भारत एकसंघ राष्ट्र आहे, ही संकल्पना नव्या पिढीत रुजवून दृढ करणे गरजेचे आहे. नवतरुणांनी महापुरुषांचे संविधानिक आचरणात्मक आदर्श वारसा दिला पाहिजे. संविधान अभ्यासणे आणि त्याचा अर्थ समजावून घेणे ही काळाची गरज आहे. 

आवर्जून वाचा- एक असे रूग्‍णालय जेथे २१ वर्षानंतर प्रथमच झाले ‘सिझर’

गौरवान्वित सामाजिक कार्यकर्ते 
कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुळकर्णी, तसेच एरंडोलचे प्रगतिशील शेतकरी शालिक गायकवाड, इकरा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अब्दुल करीम सालार, नायब तहसीलदार लीलावती कोसोदे, जात पडताळणी समितीच्या सदस्या वैशाली हिंगे यांना उल्लेखनीय कार्याबद्दल आमदार रोहित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mla rohit pawar constitution day Lecture