जगातील पाच लाख पैकी...एकट्या खानदेशात पतंगाच्या आढळतात तीनशे प्रजाती 

जगातील पाच लाख पैकी...एकट्या खानदेशात पतंगाच्या आढळतात तीनशे प्रजाती 

जळगाव ः पृथ्वीवर असलेल्या जीवन सृष्टीत मनुष्या प्रमाणे किटक, प्राणी, वनस्पती यांच्या विविध प्रजातींना नगण्य महत्व आहे. जैवविविधतेचा खुप महत्व असून पुथ्वीवरील समतोल ठेवण्याचे काम हे जैवविविधता करत असते. या जैवविविधतेचा एक घटक असलेला पंतग हा किटक (मोथ) निर्सगातील परिस्थितीचे संकेत देणारा हा किटक म्हणून बघितला जातो.

दरवर्षी दर वर्षी जुलै महिन्यात जगभरात राष्ट्रीय पतंग सप्ताह (नॅशनल मोथ विक) दिन साजरा करण्यात येतो. या सप्ताहात किटक अभ्यासक आपल्या परिसरातील कृषी व वनक्षेत्रालगतच्या परिसरात विशिष्ट प्रकारचा लाईट वापरला जातो. तसेच पांढऱया रंगाच्या पडदा व लाईटाला हे किटक आकर्षक होतात. पडद्यावर बसलेल्या पतंग प्रजातीं तसेच अन्य विविध किटकांच्या नोंदी तसेच छायाचित्र काढून विविध संकेतस्थळावर टाकणे व किटकांचा अभ्यास हा केला जातो. 


सप्ताहाची कोणी केली सुरवात ?
२०१२ साला पासून सुरू न्यू जर्सी स्थित एका स्वयंसेवी संस्थेने या सप्ताहाची सुरवात केली होती. त्यानुसार जगभरात जुलै महिन्यात हा सप्ताह साजरा केला जातो. या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने जगभरातील किटक अभ्यासक सहभाग घेवून विविध किटकांच्या प्रजाती नोंदविणे व त्याचा अभ्यास करण्याचे काम केले जाते.

जगात पाच लाख..तर भारतात १० हजार पंतग
किटक अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासातून जगभरात पतंगांच्या ५ लाखाहून अधीक प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात १० हजाराहून अधिक  पतंगांच्या प्रजाती आढळतात. 

फुलखापरू प्रमाणे पतंगाचे महत्व
फुलपाखरू आणि पतंग एकाच गणातील म्हणजे लेपिडोप्तेरा ऑडार मधील आहे. लेपिडोप्तेरा म्हणजे पंखांवर खवले असलेले कीटक. फुलपाखरू दिवसा उडतात तसेच पतंग रात्री हे उडतात. फुलपाखरू सारखे पतंगांचे निसर्गात परागीभवनामध्ये महत्वाचा वाटा आहे. त्यात मुन मोथ प्रजातीचा पंतग सगळ्यात आकर्षक असून त्याच्या पंखावर चंद्राची डिझाईन तर शेपूट मोठी असते.   

पतंग निर्सगाच्या परिस्थीचे संकेत देते.. 
पतंग प्रजातींचा निसर्गातील अन्न साखळीचा महत्वाचा वाट आहे. परिसरात आढळणाऱर्या पक्षांचे ते खाद्य आहे. तसेच पतंग प्रजाती विविध वनस्पतींवर अवलंबून असतात त्यामुळे पतंगाला निसर्गातील परिस्थीतीचा संकेत देणारे म्हणून देखील बघितले जाते. 

खानदेशात ३०० प्रजाती
२०१७ पासनू दर वर्षी जुलै महिन्यात उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्यातील पतंग प्रजातींच्या विविधतेचा शाास्त्रीय अभ्यास बायोलोजिस्ट आयडियल ऑगनाइजेशन या संस्थेमार्फत करण्यात येते. यावर्षी १८ ते २६ जुलै २०२० दरम्यान जगभरात पतंग सप्ताह साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने बायोलोजिस्ट आयडियल ऑगनाइजेशन या संस्थेमार्फत जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव तालुक्यात तसेच जळगाव लगतच्या कृषी व वनक्षेत्रालागतच्या परिसरात विशिष्ट प्रकारचा लाइट वापरुन पांढयाा, रंगाच्या पडद्यावर लावून पतंग प्रजातींची नोंद करण्यात आली. आतापयंत संस्थेमार्फत जळगाव जिह्यात ३०० हून अधिक पतंग प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात डॉ. मनोजकुमार चोपडा ( प्रा. प्राणिशास्त्र विभाग मुजे महाविद्यालय), डॉ. तणविर खान ( प्रा. वनस्पतीशास्त्र विभाग, इकरा मिाहवद्यालय), उमेश पाटील ( पीएचडी, विद्यार्थी, कीटकशास्त्र अभ्यासक), विवेक देसाई, मयरू जैन, रेवण चौधरी आदींचा सहभागी होते.  



पतंगावर अभ्यास करणारे अभ्यासक कमी असून त्यावर अजून संशोधन पेपर अजून कमी आहे. देशात दहा हजारापेक्षा अधिक पतंगाच्या विविध प्रजातींची नोंदी आहे. दर वर्षी शंभरच्या आसपास पतंगाच्या विविध प्रकार अढळून येत असून तीन वर्षात खानदेशात ३०० प्रकारच्या पतंगच्या प्रजाती आढळून आल्या आहे. 

- उमेश पाटील, किटक अभ्यासक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com