मी भाजपातच, मात्र बाबांचा निर्णय हा दुःखद - खासदार रक्षा खडसे

भूषण श्रीखंडे
Wednesday, 21 October 2020

माझ्यावर बाबांनी कधीच कुठला दबाव टाकलेला नाही. जनतेची सेवा करण हेच आमच मत आहे. मी कधीपर्यंत पक्षात राहणार याचं भाकित कुणीच करु शकत नाही.

जळगाव ः अनेक दिवसापांपासून एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी पक्षात जाणार अशी चर्चा होती. आज त्यांनी भाजप सदस्याचा खडसेंनी राजीनामा देत देवेंद्र फडणवीसावर घणाघाती आरोप केले आहे. याबाबत त्यांच्या सुनबाई खसादर रक्षा खडसेंनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी बाबांनी घेतलाल निर्णय हा व्यक्तिगत असून तो दुःखत आहे. मी भाजप मध्येच असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असे मत एका वृत्तवाहिनीवर व्यक्त केले. 

आर्वजून वाचा- देवेंद्र फडणवीसांनी माझे आयुष्य उद्धवस्थ केल्यामुळेच भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला - खडसे
 

एकनाथ खडसेंनी भाजप सोडण्याच्या घेतलेल्यावर पुढे बोलतांना म्हणाल्या, की बाबांचा (एकनाथ खडसे) निर्णय दु:खद आहे पण त्याचा निर्णय हा व्यक्तीगत आहे. लोकांनी मला भाजपकडून निवडून दिले आहे त्यामुळे मी पक्षातच राहणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण करणार अशी प्रतिक्रिया दिली.

 

चाळीस वर्ष त्यांनी पक्ष वाढवीला 

नाथाभाऊं पक्षावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय. 40 वर्ष त्यांनी पक्ष वाढवला. मात्र आज त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळं त्यांनी राजीनामा दिलाय, आहे असे खडसे  म्हणाल्या.

माझ्यावर कोणताच दबाव नाही
माझ्यावर बाबांनी कधीच कुठला दबाव टाकलेला नाही. जनतेची सेवा करण हेच आमच मत आहे. मी कधीपर्यंत पक्षात राहणार याचं भाकित कुणीच करु शकत नाही. कुणाबाबत देखील आपण असं भाकित आपण करु शकत नाही. आता आपण भाजपमध्येत असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon MP raksha khadse commented on eknathar khadse's resignation and said that he was in the BJP