महामार्ग चौपदरीकरणांसह इतर कामांची गती वाढवून नागरिकांना लाभ घेवू द्या !  

देविदास वाणी
Tuesday, 6 October 2020

कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयाबाहेर उपचाराचे दरपत्रक लावणे आवश्यक आकोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच खासगी रुग्णालये रुग्णांकडून चुकीच्या बिलांची आकारणी करीत आहेत.

जळगाव  : जिल्ह्यात पावसामुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांची गती वाढवावी. आजही ग्रामीण भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात. याबाबत सर्वच गावांमध्ये ‘स्वच्छ भारत’ योजनेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी ‘दिशा’ समितीच्या बैठकीत दिल्या. अनेक खासगी रुग्णालयांत ‘कोविड’च्या रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.

 
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ऑनलाइन झाली. या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील यांच्यासह विविध पंचायत समित्यांचे सभापती, अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. 

खासदार खडसे म्हणाल्या, की कोरोनामुळे मागील काळात लॉकडाउनमुळे विविध विकासकामे करता आली नाहीत; परंतु आता कामांना गती देऊन शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांची गती वाढवा. जिल्ह्यातील ज्या पालिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी प्राप्त झाला नसेल त्याची माहिती द्यावी, हागणदारीमुक्त गावांमध्ये नागरिक उघड्यावर शौचास जातात हे योग्य नाही. स्वच्छ भारत योजनेत वैयक्तिक शौचालयांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतरस्त्यांची कामे करावीत. कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयाबाहेर उपचाराचे दरपत्रक लावणे आवश्यक आकोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच खासगी रुग्णालये रुग्णांकडून चुकीच्या बिलांची आकारणी करीत आहेत. हे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांची लूट होणार नाही. 

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत जिल्ह्यातील पंधरापैकी दहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित तालुक्यांचा समावेश करण्यासाठी प्रशासनातर्फे शासनास प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी बैठकीत सांगितले. 

अमृत योजनचे काम लवकर करा 
खासदार पाटील म्हणाले, की शासन विविध लोकोपयोगी योजना राबवीत असते. या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जे अधिकारी योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कारवाई करावी. जळगाव शहर, भुसावळ येथील अमृत योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. शिवाजीनगर पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना रेल्वेच्या ओव्हरब्रिजवरून ये-जा करण्यास परवानगी मिळावी. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon MP Raksha Khadse instructed the officers to complete the work by holding a meeting of the direction committee