esakal | जळगाव जिल्ह्यात ५० व्हेंटिलेटर आठवडाभरात येणार
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Khadse

जळगाव जिल्ह्यात ५० व्हेंटिलेटर आठवडाभरात येणार !

sakal_logo
By
दिपक चौधरी

मुक्ताईनगर : जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, सामान्य जनतेला उपचारासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने रुग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. त्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. खासदारांच्या मागणीला केंद्रीय आरोग्य विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, पुढील सात दिवसांत जिल्ह्यात नवीन व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातून कळविण्यात आली आहे.

हेही वाचा: राज्यात जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी

रुग्णांच्या उपचारासाठी नातेवाइकांनी व्हेंटिलेटर उपलब्धतेसाठी लोकप्रतिनिधींना मागणीसह विनंती केली होती. त्या मुळे वेगवान यंत्रणा कार्यान्वित करत केंद्रीय आरोग्य विभागाकडून जळगावातील कोविड १९ प्रादुर्भावासोबत लढ्यासाठी ५० व्हेंटिलेटर मंजूर झाली असून, पुढील सात दिवसांत जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत. दरम्यान, प्रत्येकाने कोरोना प्रादुर्भावापासून बचावासाठी स्वयंशिस्तीने नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे