esakal | महापालिकेत खासदार आले अन्‌ नाराज होवून गेले
sakal

बोलून बातमी शोधा

unmesh patil

महापालिका प्रशासनातर्फे वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या आणि संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत खासदार उन्मेष पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांनी आढावा घेतला.

महापालिकेत खासदार आले अन्‌ नाराज होवून गेले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात सुरू असलेली अमृत योजनेची थंड कामे, रस्ते दुरुस्तीचे रखडलेले काम, तसेच शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल, भोईटे गेट रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांवर खासदार उन्मेष पाटील यांनी महापालिकेच्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीत महापालिकेचे अधिकारी, रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महावितरण अधिकारी उपस्थित होते. अमृत योजनेच्या संथगती कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, कामाला गती द्यावी, अशा सूचना करून खासदार पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. 
जळगाव शहरात महापालिका प्रशासनातर्फे वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या आणि संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत खासदार उन्मेष पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांनी आढावा घेतला. या बैठकीत महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, गटनेते भगत बालाणी यांच्यासह महापालिकेतील भाजपचे नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही आढावा बैठक साडेआठपर्यंत चालली. या बैठकीत अमृत योजनेच्या संथ कामाबाबत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. यासह वर्षभरापासून शहरात सुरू असलेल्या अमृत योजना, एलईडी लाइट, वॉटरग्रेस, घनकचरा प्रकल्प आणि रस्त्यावरील खड्डे आदी विषयांवरील बैठकीत चर्चा करण्यात आली. 

महिनाभरात समस्या मार्गी लावण्याच्या सूचना 
माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सप्टेंबरमध्ये महापालिकेत येऊन आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांची महापालिका प्रशासनाकडून काहीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आता खासदार उन्मेष पाटील यांनी महापालिकेत तब्बल दोन तास आढावा बैठक घेतली. तसेच महिनाभरात या समस्या मार्गी लावण्याचा सूचना दिल्या. 

रेल्वे उड्डाणपुलाच्या अडचणी तत्काळ सोडवा 
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे बोगद्याचे काम रखडल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांच्या अडचणींमुळे काम थांबल्याचे निदर्शनास आले असता अडचणी त्वरित सोडवून पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले. डी.पी. स्थलांतरित न केल्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते. 

loading image