जळगावातील बलून बंधारे, टेक्स्टाईल पार्कसाठी पंतप्रधानांना साकडे

Jalgaon News : देशातील महत्वाकांशी पशुसंवर्धन व पायाभूत सुविधा निधीच्या( AHIF ) विद्यमान मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करावी.
MP Unmesh Patil-Prime Minister Narendra Modi
MP Unmesh Patil-Prime Minister Narendra Modi
Updated on
Summary

संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यासाठी खासदार पाटील यांनी त्यांची भेट घेतली.


जळगाव: जळगाव जिल्ह्यातील बलून बंधारे (Balloon dams), टेक्सटाईल पार्क (Textile Park), विमानतळ (Airport), गणित नगरी, जळगाव शहराच्या दळणवळणासह औद्योगिक विकासासाठी खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) साकडे घातले.

MP Unmesh Patil-Prime Minister Narendra Modi
चक्क..आई वडीलांचेच स्मृती मंदिर बनवले शेतात!

संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यासाठी खासदार पाटील यांनी त्यांची भेट घेतली, त्याप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांना शीघ्रगतीने चालना मिळण्याचा आग्रह धरला. देशातील पशुसंवर्धन पायाभूत सुविधा निधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करुन डेअरी फार्मिंगचा समावेश करावा तसेच जैव इंधनावर राष्ट्रीय मंडळ स्थापन करावे यासह अन्य बाबींचाही उन्मे पाटील यांनी या भेटीदरम्यान उल्लेख केला.

पशुसंवर्धनासाठी हव्या सुविधा
देशातील महत्वाकांशी पशुसंवर्धन व पायाभूत सुविधा निधीच्या( AHIF ) विद्यमान मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करावी. यामध्ये डेअरी फार्मिंगचा उल्लेख नसल्याने दुग्ध व्यवसाय हा कृषी क्षेत्राच्या पूरक व्यवसाय भरभराटीस बाधा येणार असून यासाठी विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम ६ अंतर्गत यादीत समावेश करावा.

MP Unmesh Patil-Prime Minister Narendra Modi
घराच्या छतावर छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला मृत अर्भक

जैवइंधनाचा उल्लेख
जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरणांच्या वर्तमान स्थिती बाबत अवगत करीत जैवइंधनावर राष्ट्रीय मंडळ स्थापन करा अशा मंडळाच्या समग्र निर्णय प्रक्रियेतून जैवइंधनाच्या विकासासाठी विशेष संशोधन व विकासावर लक्ष केंद्रित करता येईल. बायो सीएनजी आणि इथेनॉलच्या विकासास प्रोत्साहन मिळेल, असे मुद्दे खासदारांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com