esakal | खडसेंचा पाठपुरावा..आणि मुक्ताईनगर तालुक्यासाठी सव्वातीन कोटींचा निधी

बोलून बातमी शोधा

fund

खडसेंचा पाठपुरावा..आणि मुक्ताईनगर तालुक्यासाठी सव्वातीन कोटींचा निधी

sakal_logo
By
दिपक चौधरी

मुक्ताईनगर : तालुक्यात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२०-२१ साठी ९९ कामे मंजूर झाली असून, त्यासाठी ३ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांसाठी ग्रामपंचायत स्तरावरून एकत्रित करून जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविले होते.

हेही वाचा: दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक

ही कामे मंजूर होण्यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंके, पंचायत समिती सदस्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मुक्ताईनगर तालुक्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंखे यांनी दिली.

गावे आणि मंजूर निधी (लाखांत)

वडोदा (३० लाख), खामखेडा (पाच), पंचाणे (तीन), कोथळी (एक), टाकळी (१२), भानगुरा (सात), घोडसगाव (१४), कुंड (सहा), सालबर्डी (पाच), चिंचखेडा बुद्रुक (दहा), ढोरमाळ (सात), चिंचोल (दहा), नरवेल, पातोंडी व मेळसांगवे (सहा ), दुई व सुकळी (आठ), धामणदे (तीन), अंतुर्ली (नऊ), पिंप्रीभोजना व रुईखेडा (आठ), इच्छापूर (सहा), उचंदे (दहा), निमखेडी बुद्रुक (१५), वढवे व मेहुण (सहा), कुऱ्हा (१२), धाबे (सात), पिंप्रीपंचम (सात), भोटा (नऊ), चांगदेव (पाच), हलखेडा (दहा), चारठाणा (नऊ), सातोड (दहा), हरताळे, मुंढोळदे, कोऱ्हाळा व थेरोळा (तीन), महालखेडा (२०), पिंप्राळा व चिंचखेडा खुर्द (सहा), बोरखेडा जुने, बोरखेडा नवे व मोरझिरा (तीन), हलखेडा जुने व पारंबी (सहा), हिवरे (दोन).

संपादन- भूषण श्रीखंडे