esakal | दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक

बोलून बातमी शोधा

corona
दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर असून बुधवारी नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा ११९ने अधिक होता. दिवसभरात १००६ रुग्ण आढळून आले तर ११२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासांत २० जणांचा बळी गेला.

हेही वाचा: कोरोनाने कुंकू पुसलं..आणि जीवनच रुसलं; एकाच कुटुंबार आली वेळ

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गेल्या महिन्यात वाढलेली तीव्रता आता तीन आठवड्यांपासून काहीअंशी कमी होत आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी ७७२९ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १००६ नवे बाधित आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख १९ हजार ९३४वर पोचली. तर ११२५ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ७ हजार २६ झाला आहे. २० जणांच्या मृत्युने बळींची संख्या २१४२ वर पोचली आहे. अद्यापही मृत्यूदर १.७९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात सारी, नॉन कोविड, कोविडनंतरची व्याधी आदींनी १४ जणांचा आज बळी गेला.

हेही वाचा: सातपुड्यातील आदिवासी करु लागले उत्तम शेती !

असे आढळले रुग्ण

जळगाव शहरात दिवसभरात १७३ नवे बाधित आढळून आले, तर २२० रुग्ण बरे झाले. जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ १३०, अमळनेर ६०, चोपडा ९७, भडगाव ११, पाचोरा ४७, धरणगाव ३३, यावल २५, एरंडोल ७३, जामनेर ३८, रावेर ७०, पारोळा २०, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ९०, बोदवड ३५, अन्य जिल्ह्यातील ७.

संपादन- भूषण श्रीखंडे