esakal | जळगाव शहरात आता मनपा तयार करणार ‘मायक्रो कंटेंटमेंट झोन’

बोलून बातमी शोधा

containment zones

जळगाव शहरात आता मनपा तयार करणार ‘मायक्रो कंटेंटमेंट झोन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः गतवर्षी कोरोना बाधीत आढळल्यास तो व्यक्ती राहत असलेली गल्ली, इमारत, फ्लॅट परिसरात कंटेंटमेंटे झोन जाहीर केला जात असे. कोरोना रुग्ण कमी झाल्याने कंटेंटमेंटे झोनचा प्रकार बंद झाला होता. आता मात्र कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागल्याने पून्हा कंटेंटमेंटे झोन सूरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकाच इमातीत, फ्लॅट परिसरात पाच व्यक्ती बाधीत आढळल्यास तो परिसर ‘मायक्रो कंटेंटमेंटे झोन’ जाहीर करून तो परिसर सील’ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी काढले आहेत.

हेही वाचा: परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम

कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शासनाने संचारबंदी, विकेंड लॉकडाऊन, आता अत्यावश्‍यक सेवेतील किराणा, भाजीपाला, दुध सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये यासाठी एखाद्या परिसरातील इमारती, फ्लॅट, हौसींग सोसायटीत पाच व्यक्ती बाधीत झाल्यास तो परिसर मायक्रो कंटेंटमेंटे झोन जाहीर करून तो सील करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे आदेश महापालिकेचे आयूक्त, पालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांना दिले आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे