जळगावच्या नागरिकांना सुसज्ज नवे नाना-नानी पार्क मिळणार ! 

भूषण श्रीखंडे
Thursday, 24 September 2020

दोन कोटी रुपये खर्चून सुसज्ज असे नाना-नानी पार्क साकारण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या महासभेत या कामाला मंजुरी देण्यात आली असून, लवकर कामाला देखील सुरवात करण्यात येणारआहे.

जळगाव ः जळगाव शहरात भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान हे जैन उद्योग समूहाने लोकसहभागातून तयार केले आहेत. या दोन उद्यानांच्या विकासामुळे जळगावकराना फिरण्यासाठी उद्यान मिळाल्याचे समाधान आहे. त्यात आता रामदास कॉलनी येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर दोन कोटी रुपये खर्चून सुसज्ज असे नाना-नानी पार्क उभारले जाणार आहे. 

रामदास कॉलनीत महापालिकेच्या मालकीचा मोकळा भूखंड अनेक वर्षांपासून तसाच पडलेला होता. या जागेवर उद्यानाचे आरक्षण असूनही या जागेचा गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून विकास झालेला नव्हता. महापौर भारती सोनवणे यांनी लॉकडाउनच्या काळात भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा देण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी पाहणी केली होती. त्यानंतर या जागेची माहिती घेऊन या जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या जागेवर दोन कोटी रुपये खर्चून सुसज्ज असे नाना-नानी पार्क साकारण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या महासभेत या कामाला मंजुरी देण्यात आली असून, लवकर कामाला देखील सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी सांगितले. 

फिरायला हक्काची जागा 
रामदास कॉलनी येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेला लागून चारही बाजूने रस्ते आहेत. तसेच या जागेवर झाडे, मंदिरही सद्यःस्थितीत असल्याने उद्यान कामाचा एक अंदाजित आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार लवकरच या उद्यानाच्या कामाला सुरवात होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal Corporation will set up a new park in Jalgaon city