esakal | एकाच कुटूंबातील तीन भाऊ, सासू-सुनेसह कुटूंब जेलमध्ये 
sakal

बोलून बातमी शोधा

jail

मित्रांसह घरासमोरच टेकडीजवळील पटांगणात जेवणासाठी गेलेला होता. त्यावेळी सत्यासिंग बावरी याने राहुलकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. राहुलने पैसे देण्यास नकार दिल्याने वाद होऊन दोघांमध्ये शिवीगाळ झाली.

एकाच कुटूंबातील तीन भाऊ, सासू-सुनेसह कुटूंब जेलमध्ये 

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून शहरातील राजीव गांधीनगर परिसरात जुलै २०१७ मध्ये २२ वर्षीय मनपा कर्मचाऱ्यास चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. रामानंदनगर पोलिसात दाखल या खुनाच्या गुन्ह्यात दोषी आढळून आलेल्या एकाच कुटूंबातील पाच आरेापींना न्या. आर. जे. कटारीया यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 
सत्त्यासिंग मायासिंग बावरी (वय ४५), रवीसिंग मायासिंग बावरी (वय २७), मलिंगसिंग मायासिंग बावरी (वय २५), मालाबाई मायासिंग बावरी (वय ६३) व कालीबाई सत्त्यासिंग बावरी (वय ४३) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण जळगाव शहरातील राजीव गांधीनगमधील रहिवासी आहेत. 

असे होते प्रकरण 
मयताचा भाऊ अजय प्रल्हाद सकट (वय २२, रा. राजीव गांधीनगर) याच्या फिर्यादनुसार घटनेच्या दिवशी (ता. १२ जुलै २०१७) त्याचा भाऊ राहुल याचा पगार झालेला होता. तो, मित्रांसह घरासमोरच टेकडीजवळील पटांगणात जेवणासाठी गेलेला होता. त्यावेळी सत्यासिंग बावरी याने राहुलकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. राहुलने पैसे देण्यास नकार दिल्याने वाद होऊन दोघांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास सत्यासिंग व त्याचे भाऊ रवीसिंग बावरी, मलिंगसिंग बावरी, आई मालाबाई, पत्नी कालीबाई यांनी घरावर हल्ला चढवुन त्याला पुन्हा लाता-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी बचाव करताना आई माळसाबाई गंभीर जखमी झाली. त्यानंतर सत्यासिंगने राहुलच्या पोटात एका मागून एक चाकू खुपसून पळ काढला. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दंगल व प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला. गंभीर जखमी राहुल सकट याला अधीक उपचारांसाठी मुंबईला नेत असतानाच त्याचा मृत्यु झाल्याने निरीक्षक बापू रोहोम यांनी दाखल गुन्ह्यात तत्काळ खुनाचे अतिरिक्त कलम जोडून गुन्हा दाखल केला. 

चौदा महत्वपुर्ण साक्ष.. 
खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मनोज नाणे, अरविंद पाटील, अजय सकट, योगेश जाधव, प्रत्यक्षदर्शी रमेश झेंडे, प्रवीण सोनवणे, म्हाळसाबाई सकट, चंद्रकांत हतांगडे, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. प्रविण पाटील, तपासाधीकारी रेाहिदास ठोंबरे, राजेश घोळवे, सुरेश आणि डॉ. निखिल सैंदाणे यांच्या साक्षी महत्वपुर्ण होत्या. 
अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जे. कटारीया यांच्या न्यायालयात कामकाज पुर्ण होवुन प्राप्त दस्तऐवज, पुरावे आणि साक्ष यांच्या आधारावर पाचही आरोपींना जन्मठेपेसह एक हजार रुपयाचा दंड तसेच, दंड न भरल्यास ३ महिन्यांची साधी कैद अतिरिक्त भोगावी लागणार आहे. विशेष म्हणजे पाचही आरोपी लावलेल्या प्रत्येक कलमात दोषी आढळलेले आहेत. या प्रकरणी सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. केतन ढाके यांनी, तर बचाव पक्षाकडून अॅड. हेमंत सूर्यवंशी, अॅड. केदार भुसारी, अॅड. प्रवीण पांडे यांनी कामकाज पाहिले. 

कुटूंब गुन्हेगारीत 
सत्यासिंग बावरी हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा असून, त्याच्यावर रामानंदनगर, जिल्हापेठ व पारोळा पोलिसांत दरोड्याचे ३ गुन्हे, पोलिसांवर हल्ला १, चोरी, घरफोडी ४, दंगल २ व खून १ असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच, सत्यासिंग हा तडीपार देखील होता. बावरी परिवारावर एकूण ४८ गुन्हे दाखल आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image