esakal | काय सांगतात राव, कोंबड्यांनी लावली हो माणसांमध्ये झुंज ! 
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगतात राव, कोंबड्यांनी लावली हो माणसांमध्ये झुंज ! 

तुमच्या कोंबड्या आमच्या अंगणात येऊन घाण करतात हे सांगितले, आणि नेहमीचा प्रकार म्हणून कोंबड्या हुसकावून लावताना वाद होऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.

काय सांगतात राव, कोंबड्यांनी लावली हो माणसांमध्ये झुंज ! 

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव  ः अनेकांनी माणसे कोंबड्यांमध्ये झुंज लावतात याचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल तर अनेकांनी प्रत्यक्ष त्यांच्या झुजीचा अनुभव देखील घेतला असेल. परंतू जळगाव शहरात उलटाच प्रकार घडला असून कोंबड्यांनीच माणसांमध्ये झुंज लावण्याची घटना घटना घडली. त्यामुळे झालेल्या हाणामारीत टन, चिकन विक्रेत्यांमध्ये थेट कोयते चालले.

जळगाव शहरातील शनिपेठ लिधुरवाडा येथील मटणविकेत्या शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणा वरुन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. तुमच्या कोंबड्या आमच्या अंगणात येऊन घाण करतात, हे सांगण्यास गेलेल्या शेजाऱ्याच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून जखमी केल्या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात १४ संशयितांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मटणविक्रेता अक्तर रशिद खाटीक (वय-४६) लिधुरवाडा शनिपेठ येथे एकत्र कुटूंबात वास्तव्यास आहेत. त्यांचे शेजारी जाकीर हनिफ खाटीक व त्यांच्या भावंडाचा चिकन विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे ५०-६० कोंबड्या आहेत. गुरुवारी सकाळी या सर्व कोंबड्या अक्तर खाटीक यांच्या दारात येऊन घाण करत होत्या. नेहमीचा प्रकार म्हणून कोंबड्या हुसकावून लावताना वाद होऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. जाकीर खाटीक व त्यांच्या कुटुंब कबिल्याने लोखंडी रॉड, लाठ्या काट्यांनी हल्ला चढवून अक्तर खाटीक व त्यांच्या परिवाराला मारहाण केली. त्यात अक्तर खाटीक यांच्या डोक्यात कोयता लागला असून जखमीने दिलेल्या जबाबा नुसार, जाकीर हनिफ खाटीक, कय्युम हनिफ खाटीक, ह्युमायु हनिफ खाटीक, सादिक जाकीर खाटीक, रऊफ ऊर्फ अच्छू जाकीर खाटीक, आसिफ जाकीर खाटीक, जावेद जाकीर खाटीक, रहेनाबी हनिफ खाटीक,जुबेर, रईस कय्युम खाटीक, कालू कय्युम, अश्पाक कय्युम, मेहेरुबी हनिफ खाटीक, रहेनाबी हनिफ खाटीक, शाईनबी खाटीक अशांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला चढवून जखमी केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top