esakal | नशिराबाद टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा..गोंधळात टोल वसूली सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Nasirabad Toll

नशिराबाद टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा..गोंधळात टोल वसूली सुरू

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः तरसोद ते चिखली दरम्यान महामार्गाच्या (Highway) चौपदरीकरणाचे ९० टक्के काम पुर्ण झाल्याने या महामार्गावर आजपासून वाहनाधारकांकडून ‘टोल’ वसुली (Toll Recovery) सुरू झाली. अचानक सुरू झालेल्या टोल वसूलीमुळे अनेक वाहनधारकांनी गोंधळ केला. तर जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांना टोलमधून सुट द्यावी असाही अनेक वाहनधारकांनी धरला. दरम्यान काही युवकांनी आम्हाला टोलनाक्यावर नोकरी (Jobs) मिळावी अशी आग्रही मागणी करीत गर्दी केली होती.

Nasirabad Toll

Nasirabad Toll

अनेक वाहनधारकांकडे फास्टटॅग नसल्याने त्यांना डबल टोल लागत होता. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. तर काहींनी वाहने साईडला लावून टोल वसुली अधिकाऱ्याकडे संताप केला. जिल्ह्यातील अनेकांनी मासिक पास काढून घेण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या.

Nasirabad Toll

Nasirabad Toll


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तरसोद ते चिखली दरम्यान
महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण केले आहे. दहा टक़्के काम बाकी असताना टोल वसूली सुरू केल्याने अनेक वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. काही राजकीय प्रतिनिधींनी येवून स्थानिकांना रोजगार द्यावा यासाठी युवकांना घेवूनच टोलनाक्यावर गर्दी केली होती.

Nasirabad Toll Crowded

Nasirabad Toll Crowded


१०० युवकांना रोजगार
टोल वसुली करण्यास उदयपूरच्या ओरल टोल असोसिएशनतर्फे टोल वसूली सुरू झाली आहे. नशिराबाद टोल नाक्याच्या २० किलोमिटर परिसरातील चारचाकी वाहनांसाठी मासिक पासची सुविधा देण्यात आली आहे. २६५ रूपयात ही सुविधा आहे. इतर वाहनधारकांकडून फास्टटॅक द्वारे वसुली सुरू आहे. ज्यांच्याकडे फास्टटॅक नाही त्यांच्याकडून नियमानूसार डबल टोलवसूल केली जात आहे. आज सकाळी काही युवकांनी रोजगाराची मागणी केली होती. त्यानूसार साकेगाव, नशिराबाद, जळगाव, भुसावळच्या शंभर बेरोजगारांना रोजगार आम्ही देणार आहोत. अशी माहिती टोलनाक्याचे शहबल खान यांनी ‘सकाळ’ दिली.

Nasirabad Toll Police

Nasirabad Toll Police

रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट)युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र सपकाळे यांनी आज सकाळी खान यांना भेटून स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली.

Nasirabad Toll

Nasirabad Toll


दिवसभर वाहनांच्या रांगा
टोल वसुली सुरू झाल्यानंतर नशिराबाद टोलनाक्यावर दिवसभर टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेकांच्या वेळेचा खोळंबा झाल्या. स्थानक चारचाकी वाहनधारकांनी मासिक पास घेण्यासाठी गर्दी केली होती.

loading image
go to top