
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या प्रतिमेवर शाई फेकली!
जळगाव ः दिवसेंदिवस पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), गॅसचे (Gas) दर वाढत असून याला मोदी सरकार जबाबदार असे म्हणत आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यात मोहाडी रोडवरील पेट्रोल पंपावर आंदोलन (NCP Movement) कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर (Petrol Pump) लावण्यात आलेल्या फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या (Prime Minister Narendra Modi) प्रतिमेवर शाई फेकण्यात आली. तातडीने पोलीस प्रशासनाने पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने फलकावरील शाई पुसून टाकली.(ncp activists protesting against fuel price prime minister image ink thrown )
इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्यानुसार आज जळगावात इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी रोडवरील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, मोदी हटाओ देश बचाओ अशा घोषणा दिल्या. तर पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदींच्या लावण्यात आलेले प्रतिमेवर कार्यकर्त्यांनी शाई फेकली. आंदोलन ठिकाणी पोलिसांनी त्वरीत धाव घेतली आणि कार्यकर्त्यांना दुर करत प्रतिमेवरील शाई पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुसून टाकण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदींनी राजीनामा द्यावा..
आंदोलना प्रसंगी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले, की कोरोनामुळे तसेच लॉकडाऊनमूळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काम धंदे बुडाल्याने जनता आधीच त्रस्त होती. त्यात गेल्या सहा महिन्यापासून केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढ करत आहे. पेट्रोल शंभरी पार, गॅस साडेआठशे रुपये असे दर वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना हे कसे परवडणार आहे. त्यामुळे वाढलेल्या महामागाईमूळे सामान्य नागरीक प्रंचड तणावात आहेत. ही दरवाढ करून मिळालेल्या पैशांचे देखील मोदी सरकार काय करते. तसेच महामागाई, रोजगार कमी करणार, मोफत गॅस आदी भुलथापा देवून मोदी सरकार निवडून आले. जनतेला दिलेले आश्वासन पंतप्रधानांनी पुर्ण करावे. त्वरीत ही केलेली दरवाढ कमी करावी. तसे जमत नसेल तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा आणि सन्यांस घ्यावा अशी मागणी केली.