esakal | जळगावसाठी दिलासा..नव्या बाधितांची संख्या दोनशेच्या टप्प्यात !
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

जळगावसाठी दिलासा..नव्या बाधितांची संख्या दोनशेच्या टप्प्यात !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (Coroan) संसर्ग नियंत्रणात येत असल्याची चिन्हे आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून बुधवारी २२१ नवे रुग्ण (New patients) आढळले तर ३३१ दिवसभरात बरे झाले. गेल्या २४ तासांत ७ जणांच्या मृत्युची (corona death) नोंद झाली. (new corona patients number low in Jalgaon district)

हेही वाचा: खडसेंना धक्का..भाजपचे पण खडसेसमर्थक ६ नगरसेवक सेनेत !


जळगाव जिल्ह्यात मार्च, एप्रिलमध्ये हजारांवर आढळून येणारे दैनंदिन रुग्ण १ मेपासून कमी होऊ लागले आहेत. आता मेच्या अखेरीस हा आकडा दोनशेच्या टप्प्यात आला आहे. बुधवारी प्राप्त ७ हजार ९४० चाचण्यांच्या अहवालात नवे २२१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार १३७ झाली आहे. दिवसभरात ३३१ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३० हजार ५७ झाला आहे.

मृत्यूही कमी होताय
रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना दररोजच्या मृत्युची संख्याही कमी होत आहे. बुधवारी ७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींचा आकडा २५१० झाला आहे. मात्र, मृत्यूदर १.८० टक्क्यांवर कायम आहे.


असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ३३, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ ४, अमळनेर ८, चोपडा ५, पाचोरा १, भडगाव ५, धरणगाव १, यावल १९, एरंडोल ३, जामनेर ३६, रावेर २३, पारोळा ५, चाळीसगाव ३६, मुक्ताईनगर १३, बोदवड १४.