esakal | रेमडेसिव्हिरच्या काळ्याबाजाराची साखळी; मोठे मासे अद्याप ‘अंडरग्राउंड’
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir black market

रेमडेसिव्हिरच्या काळ्याबाजाराची साखळी; मोठे मासे अद्याप ‘अंडरग्राउंड’

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : शासकीय रुग्णालयासह कोविड रुग्णालयातही मृत्यूशय्येवरील रुग्णांना दुरापास्त रेमडेसिव्हिर इंजेक्शन लॅब ॲसिस्टंट आणि कधीतरी एमआर असलेल्या तरुणांकडे सापडले. २६ ते ३३ हजारांपर्यंत इंजेक्शन ब्लॅकने विक्री होताना पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात ११ संशयितांना अटक केली आहे.

काळा बाजाराच्या या साखळीतील मोठे मासे अद्यापही दुरापास्त असून, त्यांच्यापर्यंत प्रशासन कधी पोचणार, हा प्रश्न आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनची ब्लॅकने विक्री करणाऱ्यांमध्ये पोलिसांनी शेख समीर शेख सगीर (वय २३, रा. शिवाजीनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर त्याने नवल कुंभार (वय २५, रा. खंडेरावनगर), सुनील अहिरे (रा. हरिविठ्ठलनगर), झुल्फिकार अली निसार अली सय्यद (वय २१, रा. इस्लापुरा, धानोरा. ता. चोपडा), मुसेफ शेख कय्युम (वय २८, रा. मास्टर कॉलनी), डॉ. आले मोहम्मद खान, सय्यद आसिफ इसा (वय २२, रा. सुप्रीम कॉलनी), अझीम शहा दिलावर शहा (वय २०, रा. सालारनगर), जुनेद शहा जाकिर शहा (वय २३, रा. सालारनगर) या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांना २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील सर्वच वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहेत. विशेष म्हणजे, सर्वच समान्य कुटुंबातील असून, त्यांनी इंजेक्शन कोठून व कसे मिळाविले याचा तपास पोलिस लावत आहेत.

स्क्षानिक पुढाऱ्यांची नौटंकी उघड

मार्च महिन्यात सहज उपलब्ध होणारे रेमडेसिव्हिर छापील पाच हजार ७०० च्या किमतीत कुणालाही मिळत होते. मात्र, समाजकार्यात झोकून दिलेल्या काही अर्धपुढाऱ्यांनी तेव्हा रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा इतका गवगवा केला, की नको त्या लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले. जिल्हा प्रशासन आणि केमिस्ट असोसिएशनच्या संयुक्त प्रयत्नानंतर एक हजार ४०० रुपयांत, नंतर एक हजार शंभर रुपयांत आणि त्यानंतर चक्क ५५० रुपयांत जळगावात विक्री होऊ लागले.

मग निर्माण केली कृत्रिम टंचाई

कवडीमोल भावात इंजेक्शनचा अनेकांनी मोठ्या प्रमाणावर साठा करून घेतला अन्‌ कृत्रिम टंचाई निर्माण झाली. विशेष म्हणजे त्याच साठ्यातून आता ३५ हजाराला एक इंजेक्शन विक्री होत आहे. तर, टॉसिलिझुमॅब चक्क दोन लाखांच्या घरात पोचले आहे. या कथित समाजसेवकांसह खिरापतीसारखे इंजेक्शन वाटणाऱ्यांची चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे.

loading image
go to top