esakal | जळगाव जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरुच; पुन्हा २१ बळी

बोलून बातमी शोधा

corona
जळगाव जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरुच; पुन्हा २१ बळी
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता व त्यापेक्षाही मृत्युचे सत्र वेगाने सुरुच आहे. आज सलग पाचव्या दिवशी २० पेक्षा अधिक म्हणजे दिवसभरात २१ मृत्युंची नोंद झाली. नवे ११०४ रुग्ण समोर आले व १०५८ बरे झाले.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या खूप वाढत नसून स्थिर आहे. दुसरीकडे रोजच्या मृत्युंचे आकडे मात्र वाढतच आहे. सोमवारी तब्बल २४ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाल्यानंतर मंगळवारी त्यात २१ बळींची भर पडून एकूण बळींचा आकडा १९७६वर पोचला. नव्या ११०४ रु्ग्णांसह एकूण रुग्णसंख्या १ लाख ११ हजार ५२८ झाली, तर १०५८ रुग्ण दिवसभरात बरे होऊन घरी गेले. बरे होणाऱ्यांचा आकडाही ९८ हजार ४२० वर पोचला आहे.

दिवसभरात विक्रमी १७ हजारांवर चाचण्या

कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंतची दिवसभरातील विक्रमी चाचण्यांची नोंद मंगळवारी झाली. मंगळवारच्या प्रशासकीय अहवालात १९७५ आरटीसीपीआर तर १५ हजार ४६५ रॅपिड ॲन्टीजेन अशा एकूण १७ हजार ४४० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ११०४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मंगळवाचा पॉझिटिव्हीटी रेट केवळ ६.३ टक्केच होता.

जळगाव शहराला दिलासा

जळगाव शहरात मंगळवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १७९ रुग्ण आढळून आले तर दिवसभरात २६१ रुग्ण बरे झाले. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णसंख्या घटून २२८१ झाली आहे.

अन्य तालुक्यात असे आढळले रुग्ण : जळगाव ग्रामीण : २६, भुसावळ १३२, अमळनेर ९३, चोपडा ७५, पाचोरा ४७, भडगाव ३७, धरणगाव ४१, यावल ४४, एरंडोल ४६, जामनेर ८३, रावेर ५५, पारोळा ५९, चाळीसगाव ६९, मुक्ताईनगर ४९, बोदवड ५१, अन्य जिल्ह्यातील १६.