esakal | ..तर आठवडाभरात कोरोना जाईल

बोलून बातमी शोधा

covid center
..तर आठवडाभरात कोरोना जाईल
sakal_logo
By
टिम इ सकाळ

भडगाव (जळगाव) : जिल्ह्यातील रूग्णांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर आठवडाभरात कोरोना हद्दपार होईल. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याचा मृत्यूदर २.३ वरून १ टक्क्यावर आल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केला. त्यात, भडगाव तालुक्याची स्थीती चांगली असल्याचे ही त्यांनी सांगीतले. शुक्रवारी (ता. २३) त्यांनी भडगाव ग्रामिण रूग्णालयात कोविडचा उपचार घेणाऱ्या रूग्णांची भेट घेतली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात अधिकारी व पत्रकारांशी चर्चा केली.

श्री. चव्हाण ते पुढे म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्यासह इतर प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. मात्र, यंत्रणेने झोकुन देऊन मेहतन घेत कुठेतरी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येताना दिसत आहे. त्यामुळेच गेल्या आठवडयाच्या तुलनेने मुत्यदर व बाधितांचा दरात मोठी घट झाली आहे.

मृत्यूदरात अन् ‘पॉझिटीव्हीटी’त घट

जळगाव जिल्ह्यात मृत्य आणि पॉझिटीव्हीटी दरात मोठी घट झाल्याचे १५ तारखेनंतर आढळून आले आहे. ते जिल्ह्यासाठी समाधानकारक आहे. अगोदर २.३ टक्के एवढा मृत्युदर होता. तो आता १ टक्केवर आला आहे. तर पॉझिटीव्हीटी दर हा १० टक्के इतका होता. आता तो टक्का खाली आला आहे. बाधितांचा दर ७ टक्के वर आला आहे. त्यात, ग्राउंड लेव्हलपर्यंतच्या अधिकारी व कर्मचार्यानी घेतली मेहनतीमुळे शक्य झाले आहे. शिवाय लसीकरण ही मोठ्याप्रणात होत असल्याने त्याचा ही परीणाम जाणवायला लागला असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगीतले. भडगाव तालुक्यात पॉझिटीव्हीटी दर ७.१४ टक्के आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्याच्यावर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगीतले. यावेळी प्रांताधिकार राजेंद्र कचरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, डॉ. प्रशांत पाटील, निवासी नायब तहसीलदार आर. बी. देवकर, वैद्यकीय डॉ. प्रतिक भोसले, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक परमेश्वर तावडे उपस्थीत होते. प्रातांधिकारी राजेंद्र कचरे यांनी दातृत्वानांचे कौतुक केले.

ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी

दरम्यान सध्या जिल्ह्यात कोविडचे रूग्ण वाढल्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अधिकारी कंपन्यामध्ये रात्री थांबून ऑक्सिजन मिळवत आहे. सध्या जिल्ह्यात ४० मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र ३५ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यापाश्वभुमिवर जिल्ह्यात १० ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजनने स्वयंमपूर्ण बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रूग्णालयातच ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यात भडगाव, चाळीसगाव, चोपडा, पारोळा, धरणगाव, रावेर, यावल, अमळनेर, जामनेर, मुक्ताईनगर याठिकाणी हे प्लांट बसविण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.