esakal | बरे होणारे जास्‍त पण; मृत्‍युच्या आकड्याची चिंता वाढती
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

बरे होणारे जास्‍त पण; मृत्‍युच्या आकड्याची चिंता वाढती

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : दुसऱ्या लाटेत दररोज बरे होणाऱ्यांची संख्या समाधानकारक असली तरी रोज होणाऱ्या मृत्युंचा आकडा चिंताजनक आहे. आतापर्यंतचे दिवसातील सर्वाधिक म्हणजे २४ जणांचा सोमवारी बळी गेला. नवे ११४७ बाधित आढळून आले तर दिवसभरात १२०९ जण बरे झाले.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग अधिक तीव्रतेने वाढतोय. दररोज हजार, अकराशे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे या दुसऱ्या टप्प्यात रुग्ण गंभीर होऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

दिवसभरात २४ बळी

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल २४ जणांचा बळी गेला. गेल्या आठवड्यापर्यंत ही दैनंदिन संख्या पंधराच्या घरात असताना चार दिवसांपासून २० पेक्षा अधिक मृत्यू होत आहेत. सोमवारी दिवसभरातील आतापर्यंतचे सर्वाधिक २४ मृत्यू नोंदले गेले. त्यामुळे एकूण बळींचा आकडा आता दोन हजारांकडे (१९५५) वाटचाल करत आहे. सोमवारी चोपडा तालुक्यात सर्वाधिक ५ व पाचोरा तालुक्यातील ४ जणांचा बळी गेला.

बरे होणारे अधिक

गेल्या तीन-चार दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण रोजच्या बाधितांपेक्षा अधिक आहे. गेल्या २४ तासांत १२०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, एकूण बरे होणाऱ्यांचा आकडा ९७ हजार ३६२ झाला आहे. तर ११४७ नवे रुग्ण सापडल्यानंतर एकूण रुग्णसंख्या १ लाख १० हजार ४२४ झाला आहे. गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असून ऑक्सिजनवरील १६६३ रुग्णांसह तब्बल ८५३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सोमवारी १५९४ आरटीपीसीआर व ७३०० रॅपिड ॲन्टीजेन अशा ८ हजार ८९४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहरात आज नवीन २३६ रुग्ण आढळून आलै, तर दिवसभरात २५० रुग्ण बरे झाले. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णसंख्या थोडी कमी होऊन २३६६ झाली.

अन्य तालुक्यात आढळलेले रुग्ण असे : जळगाव ग्रामीण ३४, भुसावळ १५३, अमळनेर ३८, चोपडा १२४, पाचोरा २५, भडगाव १९, धरणगाव ३८, यावल ४३, एरंडोल ७२, जामनेर ५५, रावेर १३९, पारोळा २७, चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर ४१, बोदवड ३६, अन्य जिल्ह्यातील १२.