esakal | दिलासा..बाधितांपेक्षा बरे झालेले अधिक; सक्रिय रूग्‍णही दोनशेने झाले कमी

बोलून बातमी शोधा

corona update
दिलासा..बाधितांपेक्षा बरे झालेले अधिक; सक्रिय रूग्‍णही दोनशेने झाले कमी
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जिल्ह्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. बुधवारी आढळलेल्‍या बाधित रूग्‍णांपेक्षा आजची संख्या कमी आली. शिवाय दाखल झालेल्या सक्रीय रूग्णांची संख्या देखील २०२ ने घटल्यामुळे आज काहीसे दिलासादायक चित्र राहिले.

जिल्हा कोविड रूग्णालयातर्फे पाठविण्यात आलेल्‍या अहवालानुसार दिवसभरात १ हजार ३४ रूग्ण बाधित आढळून आले. तर १ हजार २०४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह जामनेर, रावेर तालुक्यात संसर्ग कायम आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी नागरीकांनी काळजी घेणे हाच एक पर्याय आहे.

दहा हजाराहून अधिक अहवाल प्राप्त

जिल्‍ह्‍यात आजच्या बाधित रूग्‍णांमुळे एकुण १ लाख १३ हजार ७०४ बाधित रूग्णांची संख्या झाली असून त्यापैकी १ लाख ७५८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० हजार ९३० बाधित रूग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. विशेष म्‍हणजे आज दिवसभरात तब्‍बल दहा हजार ६८२ अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १ हजार ३४ बाधित आढळून आले आहेत.

१८ जणांचा मृत्‍यू

कोरोनामुळे मृत होणाऱ्या रूग्‍णांची संख्या ही वाढतीच राहिली. गेल्‍या आठवडाभर हा आकडा वीसच्यावर राहिला. मात्र आज दिवसभरात एकुण १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रूग्‍ण

जळगाव शहर १७५, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ ८६, अमळनेर ६७, चोपडा ५८, पाचोरा ५३, भडगाव १०, धरणगाव ४२, यावल ६७, एरंडोल ५४ , जामनेर १११ , रावेर ९६, पारोळा २४, चाळीसगाव ४९, मुक्ताईनगर १८, बोदवड ७० आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार ३४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.