esakal | रस्त्यावर फेकला टोमॅटो; किलोला कवडीमोल भाव

बोलून बातमी शोधा

tomato farmer

रस्त्यावर फेकला टोमॅटो; किलोला कवडीमोल भाव

sakal_logo
By
टिम इ सकाळ

अडावद (जळगाव) : चोपडा तालुक्यातील खरद परिसरातील शेतकऱ्याची चोपडा-यावल रस्त्यालगत शेती आहे. या शेतकऱ्यांनी टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे व तोडणीसाठी दीडशे ते दोनशे रुपये रोजाने मजुरी लागत असल्याने, हवालदिल होत अखेर टोमॅटो पीक अक्षरशः बांधावर फेकून दिल्याची घटना घडली.

भाजीपाला विक्रेत्यांची वेळ सकाळी सात ते अकरा करण्यात आली आहे. इतक्या कमी वेळेत भाजीपाला विकला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाला कवडीमोल मिळत आहे. त्यातल्या त्यात टोमॅटोला फक्त चार ते पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी आपले पीक रस्त्यावर फेकून संताप व्यक्त करीत आहेत.

तोडण्यासही परवडेना

पुरवठा प्रचंड वाढल्याने किलोमागे फक्त चार ते पाच रुपये एवढा नीचांकी भाव सध्या टोमॅटोला मिळत आहे. उत्पादनाचा खर्च अधिक आणि उत्पन्न शून्य अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. त्यात महागडी औषधे, फवारणी, मजुरी, खते आदींवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. मात्र सध्या लिलाव बंद आहे. इतर व्यापारी, भाजीपाला विक्रेते किरकोळ भावात व नगण्य किमतीत भाजीपाल्याची मागणी करतात. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.