jalgaon medical collage
jalgaon medical collagejalgaon medical collage

चांगली बातमी..एक वर्षाचा बालक २३ दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर

चांगली बातमी..एक वर्षाचा बालक २३ दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon medical collage) बालरोग व चिकित्साशास्त्र विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या एक वर्षाच्या बालकाला (child corona) वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विभागाचे कौतुक करून बालकाला रुग्णालयातून सुटी दिली आहे. (one year child corona positive recover 23 days)

जुनोने (ता. बोदवड) येथील एकवर्षीय बालकाला १७ एप्रिलला ताप, सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तो कोरोनाबाधित होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करताना त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती. प्रयोगशाळेतील तपासण्या, एक्स-रे याद्वारे त्याच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी प्रयत्न केले.

jalgaon medical collage
पत्‍नीलाच म्‍हणाला दुसरे लग्‍न करायचेय; दुसरा विवाह करताच पत्‍नीने घेतला असा निर्णय

अठरा दिवस ऑक्‍सिजन

तब्बल १२ दिवसांनी प्रकृतीत सुधारणा जाणवून वैद्यकीय पथकाला यश आले. सलग १८ दिवस ऑक्सिजन व त्यानंतर औषधोपचार करून त्याची मृत्यूची झुंज थांबवून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास २३ दिवसांनी बालरोग विभागाला यश आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरोशे यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. विश्वा भक्ता, वॉर्ड इन्चार्ज संगीता शिंदे व नर्सिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले. आज अधिष्ठाता डॉ. रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांच्या उपस्थितीत बालकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

दोन महिन्यांत ३८ बालकांवर उपचार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात मार्च ते मे या दोन महिन्यांत तब्बल ३८ कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर उपचार झाले आहेत. त्यात गंभीर १४, तर २४ इतर बालकांवर उपचार झाले. यात ३० बालकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत सहा कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून, त्यात दोन गंभीर आहेत. बालकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे जाणवली तर उशीर न करता तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com