esakal | बेड, व्हेंटिलेटर आहे.. पण डॉक्टर नाही; भाजपने साधला निशाणा

बोलून बातमी शोधा

jalgaon bjp
बेड, व्हेंटिलेटर आहे.. पण डॉक्टर नाही; भाजपने साधला निशाणा
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. रुग्णसंख्या वाढत असून गंभीर रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. असे असताना बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध असले तरी रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, स्टाफ नाही. राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून जनतेच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप भाजपनचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी केला.

जिल्ह्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने आज दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. त्यांच्याशी कोविड हॉस्पिटलमधील अवाजवी दर आकारणी, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसीव्हिरची उपलब्धता यावर चर्चा केली. जिल्ह्यात स्थिती अत्यंत वाईट असून या सर्व घटकांसाठी रुग्ण, त्यांच्या नातलगांची अक्षरश: ससेहोलपट होत आहे. ती त्वरित थांबवावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

राज्य सरकारचे अपयश

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष भोळेंनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाविरुद्ध लढण्यात राज्य सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने कालच राज्याला साडे अकराशे व्हेंटिलेटर दिले. आता सुमारे १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन एकट्या महाराष्ट्रासाठी प्रा्प्त होत असून तरीही राज्यातील मंत्री केंद्र सरकारवर टीका करताहेत. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकार कुठल्याही स्तराला जाऊन केंद्र सरकार व विरोधी पक्षांवर आरोप करत सुटले आहे.

.. तर रस्त्यावर उतरु

कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक सुविधा, औषधी, ऑक्सिजन व डॉक्टरांसह मनुष्यबळ पुरविण्यात सरकार कमी पडतेय. आता पाचव्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आहे. स्थिती सुधारली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा भोळेंनी दिला. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदारउन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, चंदू पटेल, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, दीप कसाखरे, गणेश माळी, प्रकाश पंडीत आदी उपस्थित होते.