esakal | विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा वावर 
sakal

बोलून बातमी शोधा

bibtya

विद्यापीठ परिसरात बिबट्याची मादी व दोन पिल्लांचा वावर आढळल्याने भीतिदायक वातावरण पसरले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, एरंडोल वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक यांच्याशी विद्यापीठाने पत्रव्यवहार करून उचित कार्यवाही करण्याची विनंती केली होती.

विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा वावर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात बिबट्याचा वावर असून, परिसरातील निवासस्थानात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण अधिक पसरू नये आणि कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत एरंडोलचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई आणि वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी गुरुवारी सायंकाळी रहिवाशांसोबत संवाद साधून समुपदेशन केले. 
विद्यापीठ परिसरात बिबट्याची मादी व दोन पिल्लांचा वावर आढळल्याने भीतिदायक वातावरण पसरले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, एरंडोल वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक यांच्याशी विद्यापीठाने पत्रव्यवहार करून उचित कार्यवाही करण्याची विनंती केली होती. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून विद्यापीठ परिसरात प्रत्यक्ष भेटही दिली होती. 

ट्रॅप कॅमेरे लावणार 
त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी सायंकाळी विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या कुटुंबीयांचे वनजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी समुपदेशन करत रहिवाशांनी या परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यायला हवी, हे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांनी या परिसरात लवकरच ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील, असे आश्वासन दिले. रहिवाशांतर्फे अरुण सपकाळे यांनी समस्या मांडल्या. विद्यापीठ उपअभियंता राजेश पाटील यांनी प्रास्ताविकात बिबट्याचा वावर आणि विद्यापीठ परिसराची माहिती दिली. रहिवाशांच्या शंकांचे निरसन केले.  
 

loading image
go to top