दिलासादायक : कोरोना बाधितांची जळगाव शहरासह जिल्ह्यात संख्या घटली !

भूषण श्रीखंडे
Wednesday, 21 October 2020

दिसवभरात शहरात १३ रुग्ण आढळून आले. शहरातील रुग्णसंख्याही घटत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारापेक्षा खाली आली आहे.

जळगाव : गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटत असून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. गेल्या महिन्यात जेवढा मृत्यूदर होता, तेवढाच आजही कायम आहे. तर, दिवसभरात नव्याने ११९ रुग्ण बाधित आढळले व २०४ जण बरे होऊन घरी गेले तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

आवश्य वाचा- खडसेंचा भाजपला ‘जय श्रीराम’,राष्ट्रवादीत प्रवेशाची केवळ औपचारिकता 
 

१७ सप्टेंबरपासून जिल्ह्यात दररोज कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊन बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील रुग्णांमध्ये ११९ ची भर पडून एकूण रुग्णसंख्या ५२ हजार २९० झाली आहे. तर २०४ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांचा आकडा ४९ हजार ३५४ झाला आहे. दिवसभरात दोघांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या १२४८ झाली आहे. मृत्यूदर गेल्या महिन्यात जेवढा आहे, तेवढाच कायम आहे. 

जळगाव शहराला दिलासा 
सोमवारी शहरात ५७ तर मंगळवारी २९ रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा त्यातून दिलासा मिळाला असून दिसवभरात शहरात १३ रुग्ण आढळून आले. शहरातील रुग्णसंख्याही घटत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारापेक्षा खाली आली आहे. सध्या शहरात केवळ ९०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १४, जळगाव ग्रामीण १०, भुसावळ २२, अमळनेर ५, चोपडा ८, पाचोरा १०, भडगाव ३, धरणगाव ३, यावल १२, जामनेर ११, रावेर ७, पारोळा ८, चाळीसगाव ६, ईतर जिल्ह्यातील १ असे रुग्ण आढळले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon number of corona infected patients in the district including Jalgaon city is low