जळगाव शहरात वाढला संसर्ग; दिवसभरात २९ नवे बाधित

सचिन जोशी
Monday, 14 December 2020

शहरातील असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५ हजार १२१ झाली आहे. दुसरीकहे आजही नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती.

जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग अद्याप नियंत्रणात नाही. अवघ्या दोन-तीनशे चाचण्यांमध्ये दररोज दहा- पंधरापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. सोमवारी हीच संख्या २९वर पोचली. तर जिल्ह्यात ४२ नवे बाधित आढळून आले. 

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी जळगाव शहराला धोक्याची घंटा देणारी आकडेवारी समोर येत आहे. शहरात दररोज दहापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असून सोमवारी प्राप्त अहवालानुसार तर शहरात तब्बल २९ रुग्ण वाढले. जिल्ह्यात दिवसभरात आढळून आलेल्या ४२ नव्या रुग्णांमध्ये ६५ टक्के रुग्ण शहरातील असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५ हजार १२१ झाली आहे. दुसरीकहे आजही नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. सोमवारी ५५ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांचा आकडा ५३ हजार ४२७वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे बळींची संख्या १३१४ झाली आहे. 

असे आढळले रुग्ण जळगाव शहरातील २९ व्यतिरिक्त भुसावळला ६, अमळनेर, पाचोरा व रावेर तालुक्यात प्रत्येकी १, पारोळा, चाळीसगावला प्रत्येकी २ रुग्ण आढळले. अन्य तालुक्यांमबध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon number of corona infected patients in Jalgaon