पद्मालय देवस्थानातील श्रीमुखाचे दर्शन; भाविकांसाठी असे नियम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शासनाने देवस्‍थान बंद ठेवण्यात आले होते. यानुसार पद्मालय देवस्थान देखील बंद होते. दरम्यान शासनाने राज्यातील सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी खुले केले असल्याने एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर सुध्दा खुले करण्यात येत आहे. 

जळगाव : कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये; म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत 17 मार्चपासुन शाळा, महाविद्यालय, देवस्थानं बंद ठेवले होते. मात्र शासन आदेशानुसार पद्मालय देवस्‍थान दर्शनार्थ उद्यापासून खुले करण्यात येणार आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शासनाने देवस्‍थान बंद ठेवण्यात आले होते. यानुसार पद्मालय देवस्थान देखील बंद होते. दरम्यान शासनाने राज्यातील सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी खुले केले असल्याने एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर सुध्दा उद्यापासून (ता.16) भाविकभक्तांसाठी खुले करण्यात येत आहे. 

नियम असे लागू
पद्मालय देवस्‍थान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान श्री गणेशाचे दर्शन भाविकांना घेता येईल. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी श्री क्षेत्र गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने शासन आदेशानुसार सद्यपरिस्थितीला अनुसरून देवस्थान दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. यात 60 वर्षापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या भक्तांना व लहान मुलांना मंदिरात प्रवेश नाही. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मास्क अनिवार्य असुन सॕनिटायझ केल्यानंतरच मंदिरात प्रवेश असेल. दर्शन रांगेत शासनाने ठरवुन दिलेल्या सामाजिक अंतराचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक असेल. नियमांच्या पालनांसाठी मंदिर व्यवस्थापनातर्फे सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. भाविक भक्तांचे आरोग्य सुदृढ रहावे हाच उद्देश विश्वस्त मंडळाचा असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon padmalaya ganesh tempal open tommarow