रेल्वेखाली आल्याने अनोळखीचा मृत्यू; ओळख पटविणे कठीण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

स्टेशन प्रबंधक यांच्या खबरीवरुन धरणगाव दुरक्षेत्र अंतर्गत पाळधी पोलिसांत शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी नोंद नंदूरबार लोहमार्ग रेल्वे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. . 

जळगाव : पाळधी गावाजवळ रेल्वे अप लाईनवर १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात पुरुषाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या इसमाची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. 

धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे पोस्टेशन अंतर्गत अप लाईनवर रात्री आठ वाजेच्या सुमारास ३५ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्टेशन प्रबंधक यांच्या खबरीवरुन धरणगाव दुरक्षेत्र अंतर्गत पाळधी पोलिसांत शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी नोंद नंदूरबार लोहमार्ग रेल्वे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. . 

असे आहेत मयताचे वर्णन 
यात त्या मयताचे वर्णन ३५ ते ४० वर्ष असून उंची ५ फुट ७ इंच आहे. तसेच शरीरबांधा मजबुत, नेसनीय असून अंगात पांढर्या व काळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट व करड्या रंगाची पॅन्ट असे मयताचे वर्णन आहे. या वर्णनाच्या व्यक्तीची काही माहिती मिळाल्यास नंदूरबार, अमळनेर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथे संपर्क साधावा अथवा लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुरेश महाजन यांच्या भ्रमणध्वनी ९८५०१९३२७२ या क्रमांकावर संपर्क साधावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon paldhi railway track man death